ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

६० दिवसांमध्ये हा पुणेकर ६० मॅरेथॉन धावला… ‘गिनीज’नेही घेतली दखल; कापलेलं एकूण अंतर पाहून व्हाल थक्क

पुणे | मॅरेथॉन शर्यतीच्या क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारे पुणेकर म्हणून आशिष कासोडेकर यांना ओळखलं जातं. सायकलिंग आणि बास्केटबॉलपटू अशी सुद्धा ओळख असणाऱ्या आशिष यांनी अल्ट्रा डायनॅमो या सर्वाधिक काळ चालणारी ५९ दिवसांची शर्यत पूर्ण केलीय. विशेष म्हणजे यापुढे जात आशिष यांनी ६० व्या दिवशीही धावत जागतिक विक्रम आपल्या नावावर केलाय.

आशिष यांच्या आधी हा विक्रम इटलीमधील ट्यूरिन येथील एन्झो कॅपोरासोच्या नावावर होता. २०१९ मध्ये एन्झोने १४ सप्टेंबर ते ११ नोव्हेंबरदरम्यान सलग ५९ दिवस धावण्याचा विक्रम केलेला. आशिष यांनी सलग ६० दिवसांमध्ये एकूण २५३१.७० किमी अंतर पूर्ण करत हा विक्रम मोडून काढलाय.फिट इंडिया मोहीमेच्या माध्यमातून आशिष यांनी आतापर्यंत २८ नोव्हेंबर २०२१ ते २६ जानेवारी २०२२ दरम्यान सलग ६० दिवस धावण्याचा पराक्रम केलाय. या कालावधीमध्ये आशिष हे रोज ४२ किलोमीटरहून अधिक अंतर पार करत आहेत. म्हणजेच आशिष हे रोज एका संपूर्ण मॅरेथॉन इतकं अंतर पूर्ण करत आहे. ६० दिवसांमध्ये ६० मॅरेथॉन धावण्याचा हा विक्रम आहे असं म्हणता येईल. या विक्रमाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेतली जाणार आहे.

२६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी नऊच्या सुमारास आशिष यांनी हा विक्रम आपल्या नावे केलाय. आशिष यांनी केलेल्या या विक्रमानिमित्त त्यांचं विशेष कौतुक करण्यात आलंय. भारतीय अॅथलिट शायनी अब्राहीम, सावित्रिबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरु प्राध्यापक डॉ. नितीन करमळकर, ट्रॅव्हल टाईमचे व्यवस्थापकीय संचालक आणि सह संस्थापक विवेक कळकर हे आशिषचं अभिनंदन करण्यासाठी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button