Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; पाणी कपात सुरू, महापालिका कठोर पाऊल उचलणार!

मुंबई: मुंबईसह महाष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे अनेक भागांमध्ये पाणी कपात सुरू झाली आहे. मुंबईतही आता सोमवारपासून पाणी १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आला आहे. यासोबतच मुंबई महापालिकेने सजग नागरिकांना पावसाच्या पाण्याचे संधारण करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीपुरवठ्यात एकूण क्षमतेच्या ९ टक्क्यांपर्यंत कपात झाली. पुढील काही दिवसांत जोरदार पावसाची कुठलीही शक्यता नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत मुंबई महापालिकेकडून आणखी पाणी कपात होण्याची दाट शक्यता आहे.

मुंबई महापालिकेने दोन वर्षांपूर्वी म्हणजे ऑगस्ट २०२० मध्ये २० टक्के पाणी कपात लागू केली होती. त्यावेळी जून आणि जुलै महिन्यात पुरेसा पाऊस पडला नव्हता. यामुळे महापालिकेने २० टक्के पाणी कपात केली होती.

मुंबईत मोठ्या प्रमाणावर उंचच उंच इमारती बांधल्या जात असल्याने मुंबईला फक्त तलावांच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहता येणार नाही. यामुळे पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्याबाबत मुंबई महापालिकेने सोयायट्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये जागृती केली पाहिजे. यामुळे मुंबईतील भूजल पातळी वाढवता येईल. मुंबई महापालिका विविध संस्थांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवू शकते. नागरिक या संस्थांकडे किंवा एजन्सीकडे जाऊन अधिक माहिती घेऊन पावसाच्या पाण्याचे संवर्धन करू शकतील, असं मलबार हिल्स येथील समाजिक कार्यकर्त्या इंद्राणी मलकाणी यांनी सांगितलं.

पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्याती हीच योग्य वेळ आहे. याचे अनेक फायदे आहेत. यामुळे झाडं वाचतील. यासोबतच सोसायट्यांमधल्या बोअरवेल्सना मुबकल पाणीसाठा मिळेल, असं महाराष्ट्र सरकारच्या माझी वसुंधरा अभियानाचे अॅम्बेसेडर सुभाजीत मुखर्जी म्हणाले.

मुंबई महापालिका नागरिकांना उच्च दर्जाच्या पाण्याचा पुरवठा करते. पण याच पिण्याच्या पाण्याचा उपयोग हा शौचालयासाठीही केला जात असल्याने मोठे नुकसान होते. पिण्याच्या पाण्याचा उपयोग हा शौचालय आणि इतर कामांसाठी न करता नागरिकांनी यासाठी बोअरवेल्सच्या पाण्याचा उपयोग करावा. बोअरवेल्सना पाणी राहण्यासाठी पावसाच्या पाण्याचं संवर्धन करावं, असं आवाहन मुखर्जी यांनी केलं. मुंबई महापालिका शहराला रोज ३८०० दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा करते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button