breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवडमधील कचरा वेचकांचे सर्वेक्षण तातडीने करा : क्रीडा समिती सभापती उत्तम केंदळे

  •  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरामधे असंख्य कचरा वेचक आहेत. यात बहुतांशी महिलांचा समावेश आहे; परंतु या दुर्लक्षित घटकाकडे कुणीही फारसे लक्ष देत नाही. त्यामुळे त्यांचे रोजीरोटी मिळविण्यासाठी ते आरोग्याच्या समस्येपर्यंत खूप हाल होत असल्याचे दिसून येत आहे.अशा लोकांचा पालिका प्रशासनाने सर्व्हे करून त्यांना वेगळी ओळख निर्माण करून द्यावी किंवा त्यांची शासनदरबारी किमान नोंद व्हावी, अशी मागणी क्रीडा समितीचे सभापती प्रा. उत्तम केंदळे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, शहरामध्ये अनेक कचरा कुंड्यांच्या ठिकाणी काही महिला, वयस्कर पुरुष कचऱ्यातील प्लास्टिक, कागद वेचताना पाहतो; परंतु या लोकांविषयी आपण कधी विचार करत नाही. यांच्याविषयी विचार केल्यास हे लोक नेमके कोण आहेत. या लोकांना कचऱ्यातील प्लास्टिक, कागद, लोखंड वेचून यांना किती मजुरी मिळत असेल. असे अनेक प्रश्न आपणांस पडू शकतात.

शहरामध्ये अनेक गल्ली-बोळांत कचऱ्याच्या गाड्या फिरतात; परंतु काही ठिकाणी या गाड्या जाऊ शकत नाहीत किंवा जात नाहीत अशा ठिकाणी नागरिक आपला कचरा एखाद्या मोकळ्या जागेत टाकतात, मग या कचऱ्यातील अविघटनशील घटक जसे की प्लाटिक, लोखंडाचे छोटे तुकटे, पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे कागदी बॉक्स अशा अनेक गोष्टी गोळा करून स्वतःची उपजीविका चालवणारा एक घटक म्हणजे हे कचरावेचक अनेक महिला आपल्या कुटुंबाचा आधार बनण्यासाठी हा व्यवसाय करतात व कचऱ्यातीलगोळा करून कुटुंबाच्या उपजीविकेला हातभार लावण्याचा प्रयत्न करतात.

दिवसाकाठी वेगवेगळ्या परिसरात वणवण हिंडून या लोकांना कसेतरी शंभर दोनशे रुपये पदरी पडतात; परंतु कधी कधी दिवसाकाठी दहा रुपयेसुद्धा हातात पडत नाहीत, अशा प्रतिक्रिया हे काम करणाऱ्या लोकांच्या आहेत. त्यातून जे मिळेल ते विकून आपली उपजीविका चालवतात. कचरा वेचणाऱ्यांमध्ये वयोवृद्ध पुरुष व महिलांचाही समावेश मोठ्या प्रमाणात दिसून येतो. बहुतांशी महिला या परिस्थितीने हतबल असतात. कुटुंबाचा मोठा ताण त्यांच्या पाठीमागे असतो, त्यामुळे या लोकांना हा व्यवसाय करावा लागतो. अनेकदा दुर्गंधीयुक्त कचरादेखील हाताने उचलून काही हाती लागते का, ते पाहावे लागते. कधी कधी काच फायबरसारख्या वस्तू बाजूला करताना हातापायाला जखम देखील होते. या लोकांकडे कुठल्याही प्रकारची सुरक्षा साधने दिसून येत नाहीत. अशा लोकांचा पालिका प्रशासनाने सर्व्हे करून त्यांना वेगळी ओळख निर्माण करून द्यावी किंवा त्यांची शासनदरबारी किमान नोंद व्हावी, अशी मागणीही प्रा. उत्तम केंदळे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button