क्रिडाताज्या घडामोडी

‘‘मी आता अर्धा भारतीय आहे आणि मला..”, निवृत्तीनंतर डिव्हिलियर्सने काढलेले उद्गार ऐकून तुमचेही डोळे पाणावतील!

क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डिव्हिलियर्सने आज क्रिकेटला अलविदा म्हटले.

आधुनिक क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने प्रत्येक फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. यासोबतच ३७ वर्षीय डिव्हिलियर्सने आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सोबतचाही प्रवास थांबवला. डिव्हिलियर्सने २०११ मध्ये आरसीबीकडून खेळण्यास सुरुवात केली आणि त्याने ११ हंगाम खेळले आहेत. त्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघासाठी १५६ सामन्यात ४४९१ धावा केल्या. आरसीबीसाठी तो कोहलीनंतर दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.तो म्हणाला, “मी आरसीबीकडून बराच काळ खेळलो. नुकतीच ११ वर्षे झाली आणि आता संघ सोडणे हा आंबट गोड अनुभव आहे. हा निर्णय घ्यायला खूप वेळ लागला पण माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी मी खूप विचार करून हा निर्णय घेतला. मी आरसीबी व्यवस्थापन, माझा मित्र विराट कोहली, सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, चाहते यांचे आभार मानू इच्छितो. आरसीबी नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ असेल आणि आम्ही या संघाला नेहमीच प्रोत्साहन देत राहू.”

एबी डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, “मी आयुष्यभर आरसीबियन राहणार आहे. आरसीबीच्या सेटअपमध्ये प्रत्येकजण माझ्यासाठी एक कुटुंब बनला आहे. लोक येतात आणि जातात, पण आरसीबीची एकमेकांबद्दलची भावना आणि प्रेम नेहमीच राहील. मी आता अर्धा भारतीय आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.”

डीव्हिलियर्सच्या निवृत्तीनंतर आरसीबीनेही ट्वीट केले. “एका युगाचा अंत! तुझ्यासारखा कोणी नाही, एबी… आरसीबीमध्ये आम्हाला तुझी खूप आठवण येईल. तुम्ही संघाला, चाहत्यांना आणि सर्वसाधारणपणे क्रिकेट प्रेमींना जे काही दिले त्याबद्दल एबीचे आभार… निवृत्तीच्या शुभेच्छा, लीजेंड!”, असे आरसीबीने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button