पिंपरी / चिंचवड

फायनान्स कंपनीने सील केलेल्या खोलीचा बेकायदेशीरपणे ताबा घेत एकास जीवे मारण्याची धमकी

पिंपरी | प्रतिनिधी

फायनान्स कंपनीने सील केलेल्या खोलीचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला. तसेच एकास जावे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 26 फेब्रुवारी ते 22 मार्च या कालावधीत अमरावती पीजी, हिंजवडी येथे घडली.

पप्पूकुमार सहदेवप्रसाद गुप्ता (वय 40, रा. हिंजवडी. मूळ रा. बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मोहित जसबीर शोकीन (वय 29, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची रूम फायनान्स कंपनीने सील व जप्त केली होती. ती रूम फिर्यादी यांच्या ताब्यात होती. तरीही आरोपीने रूमचा ताबा घेण्याच्या उद्देशाने रूमचे कुलूप तोडुन रूमचा ताबा घेतला. इतरांना रूममध्ये राहण्यास दिले. तसेच आरोपीने फिर्यादी यांच्या रूमचा पाणीपुरवठा बंद केला. तो सुरू करत असताना त्यांच्या अंगावर धावून येत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button