breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोनाबाधित मृतावरील अंत्यसंस्कारासाठी पैसे मागितल्यास थेट तक्रार करा – आयुक्त राजेश पाटील

पिंपरी |महाईन्यूज|

कोरोनाबाधित मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी एखादी व्यक्ती पैसे मागत असेल तर त्याबाबत महापालिकेकडे तक्रार करण्याचे आवाहन पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

कोरोनाबाधित व्यक्तींवर पारंपारिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक असलेल्या लाकूड सरणाची उपलब्धता महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. पालिकेने त्यासाठी तीन काळजीवाहक संस्थांची नियुक्ती केली आहे. कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या अंत्यसंस्कराची जबाबदारी या तीन संस्थांवर असणार असून महापालिका या संस्थांना त्याची ठराविक रक्कम देणार आहे.

कोरोनाबाधित मृत व्यक्तींच्या पार्थिवावर महापालिकेच्या विद्युत, गॅस दाहिनीमध्ये अंत्यविधी करण्यात येत आहेत. कोरोनाबाधितांच्या वाढत्या मृत्यूमुळे निगडी, सांगवी, भोसरी, लिंकरोड, चिंचवड व नेहरुनगर येथील पारंपारिक स्मशानभूमीमध्ये कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास देखील परवानगी देण्यात आलेली आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेले लाकूड, सरणाची उपलब्धता करण्याकरिता वरील स्मशानभूमींकरिता काळजीवाहक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या संस्थांमार्फतच लाकूड, सरणाची उपलब्धता करण्यात येत आहे.

एका मृतदेहाचे अंतिम संस्कारासाठी साधारणपणे 1 ने 10 मण लाकूड तसेच 150 गोवऱ्यांची आवश्यकता असते. लाकडाचा दर 450रुपये प्रति मण असून एका गोवरीची किंमत 8 ते 10 रुपये इतकी आहे. म्हणजेच 10 मण लाकडासाठी 4 हजार 500 रुपये आणि 150 गोव-यांसाठी अंदाजे एक हजार 500 रुपये असा एकूण सहा हजार इतकी रक्कम मृतदेहाचे अंत्यसंस्कारासाठी आवश्यकता असते.

 

स्मशानभूमी नाव ( संस्थाचे मोबाईल नंबर)

# निगडी स्मशानभूमी (मे. शुभम उद्योग – 9011093692)
# सांगवी स्मशानभूमी (मे. महालक्ष्मी स्वयंरोजगार सेवा सह. संस्था – 9623578157)
# भोसरी स्मशानभूमी (मे. शुभम उद्योग – 9011093692)
# लिंकरोड चिंचवड स्मशानभूमी (मे. जयभवानी एंटरप्राइजेस 7720047591)
# नेहरुनगर स्मशानभूमी (मे. जयभवानी एंटरप्राइजेस 7720047591)

मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यास कोणी पैसे मागितल्यास खालील मोबाईलवर तक्रार करा 

9011093692
8080891370
9881092089
9579874571

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button