breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अफगाणिस्तानमध्ये महिलांना लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर…; तालिबानचा महिलांसाठी नवा नियम लागू

नवी दिल्ली |

अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर तिथल्या मुली आणि महिलांच्या आयुष्यात अनेक निर्बंध आले आहेत. महिलांना दैनंदिन जीवनात अनेक बंधनांचा सामना करावा लागत आहे. यातच तालिबानने नवीन एक घोषणा केली आहे. अफगाणिस्तानमध्ये ज्या महिलांना लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल त्यांच्यासोबत पुरुष नातेवाईक असणं आवश्यक आहे. जर सोबत पुरुष नातेवाईक नसेल तर या महिलांना प्रवास करता येणार नाही, असे तालिबानी अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.

सद्गुणांच्या प्रचारासाठी आणि दुर्गुणांच्या प्रतिबंधासाठी हा निर्णय घेतल्याचं मंत्रालयाने जारी केलंय. तसेच वाहन मालकांना हेडस्कार्फ न घालणाऱ्या महिलांना प्रवास करण्यास नकार देण्याचे आवाहन केले. दरम्यान, या निर्णयाचा मानवी अधिकार कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात आला. तालिबानने १५ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानवर सत्ता काबीज केली. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत अनेक महिलांना कामावर परत येण्यापासून रोखले. तसेच तालिबानच्या नवनव्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात मुली शिक्षणापासून वंचित झाल्या आहेत. त्यातच तालिबानने महिलांवर निर्बंध घालणारा आणखी एक निर्णय घेतलाय.

“७२ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या महिलांना त्यांच्या कुटुंबातील जवळचा सदस्य नसल्यास त्यांना प्रवास करू देऊ नये. ज्यांना प्रवास करायचा आहे, त्यांच्यासोबत पुरुष नातेवाईक असणं आवश्यक आहे,” असे मंत्रालयाचे प्रवक्ते सादेक अकीफ मुहाजिर यांनी रविवारी एएफपीला सांगितले. दरम्यान, दुसरीकडे सोशल मीडियासाठी नवीन नियम बनवण्यात आले आहे. त्यानुसार लोकांना त्यांच्या वाहनांमध्ये संगीत वाजवणे थांबवण्यास सांगितले आहे. तसेच काही आठवड्यांपूर्वी, मंत्रालयाने अफगाणिस्तानच्या टीव्ही वाहिन्यांना महिला कलाकारांची नाटके आणि गाणी दाखवणे बंद करण्यास सांगितले. तसेच महिला टीव्ही पत्रकारांना सादरीकरण करताना डोक्यावर स्कार्फ घालण्यास सांगितले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button