breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रियव्यापार

GST भरताना चूक झाल्यास आता होणार थेट कारवाई, कायद्यात सुधारणा

नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
GST भरताना कोणतीही चूक झाल्यास आता महागात पडणार आहे. कारण यापुढे GST भरताना चूक झाल्यास किंवा चुकीची माहिती भरल्यास नोटीस पाठवण्यापेक्षा अधिकारी घरी थेट वसुलीसाठी येणार आहेत.

१ जानेवारीपासून हा नियम लागू होणार असून चुकीची बिले दाखवण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी ही पावले. मासिक GSTR-1 फॉर्ममध्ये जादा विक्री दाखवणारे व्यवसायिक कर दायित्व कमी करण्यासाठी पेमेंट संबंधित GSTR-3B फॉर्ममध्ये तसाच अहवाल देतात, अशी अनेकदा तक्रार केली जाते. पंजाब केसरीच्या वृत्तानुसार, सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी वित्त विधेयकात या बदलाची तरतूद केली होती.

२१ डिसेंबर रोजी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) GST कायद्यातील सुधारणा अधिसूचित केल्या. त्यानंतर 1 जानेवारी 2022 पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. यापूर्वी अशी तफावत समोर आल्यावर जीएसटी विभागाकडून नोटीस बजावली जायची आणि त्यानंतर वसुलीची प्रक्रिया सुरू व्हायची, मात्र नियम बदलल्यानंतर अधिकारी थेट वसुलीची प्रक्रिया सुरू करू शकतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button