पिंपरी / चिंचवडपुणे

मनामध्ये भाव चांगला असला की चांगले कार्य उभे राहते : माजी खासदार विदुरा नवले

पिंपरी चिंचवड एज्युजकेशन ट्रस्टच्या स्वायत्त विद्यापीठाचे सातेगाव येथे भूमिपूजन

मावळ l प्रतिनिधी

मनामध्ये भाव चांगला असला की चांगले कार्य उभे राहते. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून जगभर ओळखले जाते. पुण्यात लोकमान्य टिळक, आगरकर आणि गोखले यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण संस्थांची पायाभरणी झाली. आता त्यांच्या नंतर शंकरराव बाजीराव पाटील उर्फ भाऊ यांचे नाव घ्यावे लागेल. भाऊ आणि लोकनेते शरद पवार यांनी चांगल्या कामात कधीही राजकारण केले नाही. शिक्षण क्षेत्रात या संस्थेची योग्य वाटचाल सुरु आहे. सर्व विश्वस्तांचे एकमेकांशी असलेल्या विश्वासाच्या नात्यातून निर्माण झालेली हि संस्था म्हणजेच ‘पिंपरी चिंचवड विद्यापीठाची’ स्थापना होय असे प्रतिपादन माजी खासदार विदुरा नवले यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या स्वायत्त विद्यापीठाचा भुमिपूजन समारंभ माजी खासदार विदुरा नवले यांच्या हस्ते मावळ तालुक्यातील सातेगाव, मोहितेवाडी येथे रविवारी (दि. 23) संपन्न झाला. यावेळी माजी खासदार विदुरा नवले बोलत होते. कार्यक्रमासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके, माजी आमदार कृष्णरावजी भेगडे, पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे. उपाध्यक्षा पद्मा भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई तसेच ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, चंद्रकांत सातकर, मावळचे तहसिलदार मधुसूदन बर्गे, एनएमव्हीपीएमचे संतोष खांडगे, रामदास काकडे, चंद्रकांत शेटे, नंदकुमार शेलार, भाऊसाहेब कारके, सातेगावचे सरपंच व उपसरपंच आणि उद्योजक राजू म्हस्के, आर्किटेक्ट किरण काळे आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) व नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट (एनएमआयटी) सी संबंधित सर्व शाळा महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्य उपस्थित होते.

माजी खासदार विदुरा नवले म्हणाले, भाऊ हे दुरदृष्टी असलेले द्रष्टे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मी आणि कृष्णराव भेगडे, ज्ञानेश्वर लांडगे, विठ्ठल काळभोर, पद्माताई भोसले, शांताराम गराडे, हर्षवर्धन पाटील यांनी लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष होत असताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. हे सर्व विश्वस्त सामाजिक बांधिलकी मानणारे आहेत. श्रीरंग बारणे हे संसद रत्न पुरस्कार विजेते खासदार आहेत ही मावळच्या नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे असेही विदुरा नवले म्हणाले.

माजी आमदार कृष्णरावजी भेगडे म्हणाले, भारताच्या शिक्षण क्षेत्रात जी स्थित्यंतरे होत आहे. त्याचे आपण साक्षीदार आहोत. या बदलाचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हावा यासाठीच सर्व विश्वस्त काम करीत आहेत. भाऊंबरोबर आमदार म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. आता मावळचा समावेश पीएमआरडीएमध्ये झाला आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून आगामी काळात भव्य शैक्षणिक संकुल उभे राहिल. तसेच परदेशातील नामवंत विद्यापीठांच्या दर्जाचे शिक्षण येथे मिळेल. तसेच हजारो नविन रोजगार निर्माण होतील. पिंपरी चिंचवड विद्यापीठ मावळमध्ये होणे म्हणजे मावळच्या नावलौकिकात भर पडणार आहे.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे म्हणाले, या नविन विद्यापीठात पुढील शैक्षणिक वर्षात साधारणता: चौदाशे ते पंधराशे विद्यार्थ्यांना विविध शाखेत प्रवेश देण्याचा मानस आहे. जगभरातील तीसहून जास्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी सामंजस्य करार झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी उच्च दर्जाचे शिक्षण मिळेल. पहिल्या टप्प्यात दहा एकर जागेत शैक्षणिक संकुल उभारले जाईल. लवकरच त्याचा विस्तार करण्यात येईल असेही ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले.

स्वागत विठ्ठल काळभोर यांनी केले. प्रास्ताविक डॉ. गिरीश देसाई यांनी केले. शांताराम गराडे यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button