breaking-newsताज्या घडामोडीपुणे

नागरिकांनी निर्बंध पाळल्यास तिसऱ्या लाटेचा धोका टळेल – महापौर मुरलीधर मोहोळ

  • मुकुल माधव फाउंडेशन व्ही क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने अक्षय रुग्णालयात मोफत ऑक्सिजन कॉनसेन्ट्रेटरची सोय
पिंपरी / महाईन्यूज
तिसरी लाट येऊच नये आणि हे ऑक्सिजन कॉनसेन्ट्रेटर वापरण्याची वेळच येऊ नये अशी परमेश्वराकडे प्रार्थना आहे मात्र त्यासाठी नागरिकांनी निर्बंध पाळले पाहिजेत असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.
मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने एरंडवण्यातील अक्षय रुग्णालयात मोफत ऑक्सिजन कॉनसेन्ट्रेटरची व्यवस्था करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, प्रसिद्ध मधुमेह तज्ञ् डॉ. सुहास एरंडे, महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, प्रभाग सरचिटणीस बाळासाहेब धनवे, निलेश गरुडकर, ऍड. प्राची बगाटे, सुभाष ढावरे, किरण देखणे, अपर्णा लोणारे, हेमंत बोरकर आदी उपस्थित होते.
नागरिकांनी त्रिसूत्री पाळावी, असे आवाहन करतानाच महापौर मोहोळ यांनी स्वयंशिस्त महत्त्वाची असल्याचे सांगितले, जास्तीत जास्त लसीकरण आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सुरक्षिततेच्या उपाययोजना पाळल्यास तिसरी लाट येण्यास प्रतिबंध करता येईल असेही महापौर म्हणाले.
पुणे मनपाने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले असून दुसऱ्या लाटेच्यावेळी ऑक्सिजनअभावी झालेले हाल आता होणार नाहीत. मात्र, अशा छोट्या-छोट्या रुग्णालयात ऑक्सिजन कॉनसेन्ट्रेटरची सोय उपलब्ध झाली. तर, ऑक्सिजन लेव्हल कमी झालेल्या रुग्णास प्राथमिक उपचार त्वरित मिळावेत, या हेतूने मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन प्रयत्नशील असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले. प्रभाग 13 मधील एका ही नागरिकांस ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, असे नियोजन केले असल्याचे समन्वयक बाळासाहेब धनवे, निलेश गरुडकर, ऍड प्राची बगाटे यांनी स्पष्ट केले. ह्या परिसरातील नागरिकांना ह्या ऑक्सिजन कॉनसन्ट्रेटर च्या माध्यमातून मोफत प्राथमिक उपचार उपलब्ध केले जातील, असे डॉ. सुहास एरंडे यांनी सांगितले.
संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले. निलेश गरुडकर यांनी सूत्रसंचालन तर ऍड प्राची बगाटे यांनी आभार मानले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button