TOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज ठाकरे यांनी केले आहे या चित्रपटात काम ?

  • शिवरायांचा चित्रपट म्हणून मी आवाज दिला; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटात आवाज दिला आहे. ‘हर हर महादेव’ हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असलेला चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटात आवाज दिला आहे. ‘हर हर महादेव’ हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असलेला चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीर मराठी अभिनेते सुबोध भावे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांनी शिवरायांवर चित्रपट होता, म्हणून मी आवाज दिला, असे राज ठाकरे यांनी म्हटले. शिवाय, राज ठाकरे यांनी चित्रपटाशी संबंधित अनेक किस्से सांगितले.

शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित ‘हर हर महादेव’ चित्रपटात दिसणार आहे. सुबोध भावे शिवरायांच्या भूमिकेत असणार आहे, तर अभिनेता शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत आहे. या चित्रपटामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला आवाज दिला आहे. या निमित्ताने सुबोधने राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी चित्रपटाशी संबंधित अनेक किस्से सांगितले.

या मुलाखतीच्या सुरुवातीला अभिनेता सुबोध भावे याने राज ठाकरेंना तुमचे खरे नाव स्वरराज, मग राज ठाकरे कस झाले? असा विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी “माझ्या वडिलांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. मी संगीतात काहीतरी करेन, असे त्यांना वाटायचे. पण, मी व्यंग काढायला लागलो. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, मी बाळा ठाकरे नाव लावतो, तू राज ठाकरे लाव. तेव्हा माझे दुसऱ्यांदा बारसे झाले”, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

त्यानंतर हर हर महादेव चित्रपटाला आवाज का दिला? असा प्रश्न विचारला असता, “मी पहिल्यांदा 2003मध्ये व्हॉइस ओव्हर केला होता. तेव्हा बाबासाहेब पुरंदरेंची मुलाखत घेतली होती. 2004ला शिवसेनेचे कँपेन केले होते. तेव्हा 9 अॅड फिल्म्स केल्या होत्या. त्यांना अजित भुरेंनी आवाज दिला. त्यातील एका फिल्ममध्ये सुरुवातीचा आवाज दिला होता. या चित्रपटाला आवाज देण्याचे कारण म्हणजे, चित्रपट शिवरायांचा आहे. याच कारणामुळे आवाज दिला”, असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button