TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बाळासाहेबांच्या शिवसेनेचा ‘हुंकार’

महापालिका निवडणुकीची तयारी : जिल्हाप्रमुखपदी वाल्हेकर, शहरप्रमुखपदी तरस

पिंपरी: बाळासाहेबांची शिवसेनेच्या मावळ जिल्हाप्रमुखपदी बाळासाहेब वाल्हेकर तर पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी निलेश तरस यांची निवड करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड युवासेना प्रमुखपदी विश्वजीत बारणे, महिला संघटिकापदी सरिता साने आणि युवती विस्तारकपदी शर्वरी गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर, मावळ तालुकाप्रमुखपदी राजेश खांडभोर यांची नियुक्ती केली. बाळासाहेबांची शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (बुधवारी) पदाधिकारी जाहीर केले. 200 पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आली.

बाळासाहेबांची शिवसेनेचा पदाधिकारी नियुक्ती मेळावा खासदार बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑटो क्लस्टर येथे पार पडला. उपनेते, कामगार नेते इरफान सय्यद उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, पिंपरी, चिंचवड आणि मावळचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले. पिंपरी-चिंचवडच्या उपजिल्हाप्रमुखपदी राजेश वाबळे, मावळच्या उपजिल्हाप्रमुखपदी शरद हुलावळे, मावळ जिल्हा संघटकपदी अंकुश देशमुख, पिंपरी-चिंचवड उपशहरप्रमुख बशीर सुतार, दत्तात्रय भालेराव, पिंपरी विधानसभा प्रमुखपदी रुपेश कदम, चिंचवड विधानसभा प्रमुखपदी सुरेश राक्षे, पिंपरी-चिंचवड शहर संघटकपदी सोमनाथ गुजर, रवींद्र ब्रम्हे, हाजी शेख, पिंपरी विधानसभा संघटकपदी सय्यद पटेल, उपविधानसभा संघटकपदी शरद मुळे, अॅड. मुकुंद ओव्हाळ, नामदेव घुले, पिंपरी विधानसभा संघटकपदी नरेश टेकाडे, संदीप पवार, निखील येवले, पिंपरी विधानसभा समन्वयक सुनील पाथरमल, अॅड. दिलीप पाटील, रुपेश चांदेरे, चिंचवड उपविधानसभा संघटकपदी राजेश अडसूळ, अंकुश कोळेकर, प्रशांत कडलग, महेश कलाल, चिंचवड विधानसभा संघटकपदी रोहिदास दांगट, संतोष बारणे, सुदर्शन देसले, चिंचवड विधानसभा समन्वयकपदी प्रदीप दळवी, हेमचंद्र जावळे, मयूर तरस, प्रसिद्धी प्रमुखपदी सागर पाचारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर युवती संघटिकापदी शर्वरी गावंडे, चिंचवड विधानसभा संघटिकापदी श्वेता कापसे, चिंचवड उपविधानसभा संघटिकापदी वैष्णवी जाधव, समन्वयकपदी रितू कांबळे यांची निवड करण्यात आली. याशिवाय पिंपरी-चिंचवड व्यापारी सेलच्या अध्यक्षपदी किशोर केसवानी, चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत गांगड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार – बारणे

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”बाळासाहेबांची शिवसेनेची पदाधिकारी पक्षाचे काम जोमाने करतील. पक्षाचे मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने पक्ष संघटन वाढविले जाईल. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. या निर्णयांचा तळागाळातील लोकांना लाभ मिळवून देण्याचे काम पक्षाचे पदाधिकारी करतील. बाळासाहेबांची शिवसेनेचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवतील. आगामी महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत. पक्षाचे जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मित्र पक्ष भाजपसह आमची महापालिकेत सत्ता येईल” असा विश्वासही खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button