ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हुंडाबळी ! पती, सासु – सासरे आणि दिरावर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड | हुंड्यासाठी विवाहीत महिलेचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासु – सासरे आणि दिरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27-04-2019 ते 31-07-2019 या कालावधीत येलवाडी, ता. खेड याठिकाणी हा प्रकार घडला.नेहा सचिन बोत्रे (वय 23) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिलेच्या वडीलांनी म्हाळुंगे पोलीस चौकीत शुक्रवारी (दि.12) फिर्याद दिली आहे.त्यानुसार पती सचिन देवीदास बोत्रे (वय 38), सासु मुक्ता देवीदास बोत्रे (वय 52), सासरे देवीदास गणपत बोत्रे (वय 58) आणि दीर निलेश देवीदास बोत्रे (वय 32) (सर्व रा. येलवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 498 अ, 304 ब आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विवाहित महिलेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच, वारंवार टोचून बोलत मारहाण केली. अखेर त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button