breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महाबळेश्वरमध्ये हुडहुडी वाढली! पारा ४ अंश सेल्शिअसवर घसरला
सातारा | प्रतिनिधी
थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. येथील तापमान ४ अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. कडाक्याच्या थंडीसोबतच थंड हवा वाहत असल्यामुळे महाबळेश्वरमध्ये काश्मीरच्या थंडीचा अनुभव मिळत आहे. वेण्णा लेकसह लिंगमळा परिसरात हिमकण तयार झाले आहेत.
महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका वाढला असल्यामुळे स्थानिक बचावासाठी शेकोटीचा आधार घेत आहेत. बाजारपेठेतही स्वेटर आणि गरम कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरात हवेत आद्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे दवबिंदू पडण्यास सुरुवात झाली आहे. वेण्णा लेक परिसरातील लोखंडी जेटी, वाहनांचे व घरांचे छत आणि झाडांच्या पानावर हिमकण दिसत आहेत. स्थानिक आणि पर्यटकांसाठी ही एक पर्वणी आहे.