TOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

15 लोकांसमोर न्यूड सीन देताना कशी होती मनस्थिती, अभिनेत्रीचा मोठा खुलासा

मुंबई : अभिनेत्री अमला पॉल ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या चित्रपटांमुळे ती वादाच्या भोवऱ्याच अडकते. अमला पॉलला चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिल्यामुळे ट्रोल करण्यात आलं होतं. ‘आडाई’ (Aadai) या तामिळ चित्रपटात तिनं न्यूड सीन दिला होता, त्यानंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले होते. आता लवकरच अमला पॉल अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

अमला पॉलला ‘आडाई’ या तमिळ चित्रपटातील न्यूड सीनमुळे टीकेला सामोरे जावे लागले होते. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच लोकांमध्ये खळबळ उडाली होती. खरंतर या चित्रपटाची ऑफर येण्याआधी जवळजवळ अमलानं चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला होता. अमलानं ‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या सीनच्या शूटिंगवेळी दिग्दर्शकानं तिला स्पेशल कॉस्ट्युम परिधान करण्याचा सल्ला दिला होता. मी दिग्दर्शकाला काळजी करू नका असे सांगितले. मला स्ट्रेस आलं होतं हे त्यांना कळलं होतं, पण जेव्हा मी कॉन्फिडन्स असेन तेव्हा मला काहीच जाणवणार नाही. मी व्यवस्थित शूट करेन हे मी त्यांना पटवून दिले आहे. 

15 लोकांसमोर दिला न्यूड सीन

सेटवर काय होणार, कसे होईल. तेथे कोण उपस्थित असेल? सिक्योरिटी असेल का? याचं मला स्ट्रेस होतं. सेटवर एकूण 15 लोक होते. माझा त्या 15 लोकांवर विश्वास नसता तर मी कदाचित तो सीन करू शकले नसते. तो सीन शूट करऱ्यासाठी मी कम्फर्टेबल होतं.

https://www.instagram.com/amalapaul/?utm_source=ig_embed&ig_rid=a34cfd4e-74b3-4702-a0e9-46af3faec2ba

अमलाने वयाच्या 17 व्या वर्षी ‘नीलतमारा’ या मल्याळम चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर तिने तमिळ व्यतिरिक्त काही तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले. अमलाने तेलुगूमध्ये रामचरण, अल्लू अर्जुन, नानी यांसारख्या सुपरस्टार्ससोबत काम केले पण तरीही तिने या इंडस्ट्रीला रामराम ठोकला. तेलुगू फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोलताना अमाला म्हणाली, “जेव्हा मी तेलुगू इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हा मला वाटले की तिथे कौटुंबिक वातावरण असलेले चित्रपट बनवले जातील. पण चित्रपटांमध्ये 2 अशा अभिनेत्री राखून ठेवलेल्या असतात ज्या फक्त लव्ह सीन्स आणि गाण्यांवर डान्स करतात. हे लोक भरपूर कमर्शियल सिनेमा बनवतात आणि मी त्यात काम करू शकत नाही. (amala paul nude scene controversy ajay devgn bhola special apperance) 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button