पिंपरी / चिंचवड

हॉटेल मधील कामगारांना दांडक्याने मारहाण; दोघांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

हॉटेलमध्ये काम करणा-या कामगारांना दोघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. स्टाफ रूममध्ये कामगार झोपलेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. 1) रात्री नऊ वाजता कुसगाव येथील एम्ररिस हॉटेलमध्ये घडली.

प्रज्वल शांताराम कदम, रंजित विजय केदारी (दोघे रा. कुसगाव, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मिलिंद रमेश कांबळे (वय 32, रा. भोसरी) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कुसगाव येथील एम्ररिस हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतात. आरोपींनी विनाकारण हॉटेलच्या स्टाफरूम समोर येऊन लाकडी दांडक्याने स्टाफ रूमचा दरवाजा तोडला. हॉटेलच्या स्टाफला मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादी घाबरून विजय आडसूळ यांच्याकडे गेले आणि या प्रकाराबद्दल त्यांना सांगितले. फिर्यादी आणि विजय आडसूळ स्टाफ रूमकडे आले असता आरोपी स्टाफरूम मध्ये झोपलेल्या आठ कामगारांना लाकडी दांडक्याने मारहाण करीत होते. फिर्यादी आणि विजय आडसूळ आल्याचे पाहून आरोपी पळून गेले. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button