पिंपरी / चिंचवड

हॉटेलच्या बनावट नावाने बिले देत ग्राहक व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी हॉटेल मॅनेजरला अटक

पिंपरी | प्रतिनिधी

हॉटेल आस्थापनेचे परवाने ज्या नावाने आहेत त्या नावाने बिले न देता ग्राहकांची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी हॉटेल मॅनेजर आणि हॉटेल मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील हॉटेल मॅनेजरला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार जगताप डेअरी चौकातील द मॅजेस्टिक हॉटेल मध्ये घडला.

मॅनेजर अनुराग सुभाष भिलारे (वय 31, रा. शुक्रवार पेठ, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह होटेल मालक चिराग संदीप थोरवे (रा. जगताप डेअरी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक अविनाश गायकवाड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चिराग थोरवे यांचे जगताप डेअरी चौकात हॉटेल आहे. त्या हॉटेलचा परवाना आदिनाथ गोपी लॉन्ज अँड बार पिंपळे निलख या नावाने आहे. आरोपी अनुराग भिलारे हा त्या हॉटेलवर मॅनेजर म्हणून काम करतो. आरोपींनी परवाने असलेल्या नावाचा वापर न करता द मॅजेस्टिक लॉन्ज अँड बार हे नाव वापरून तशी ग्राहकांना बिले दिली. यामध्ये ग्राहकांची आणि शासनाची आरोपींनी फसवणूक केली. पोलिसांनी अनुराग भिलारे याला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 1) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास करण्यात आली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button