breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समृध्दी महामार्गावर भीषण अपघात; १3 मजूर ठार, 3 जण गंभीर जखमी

बुलडाणा – येथील सिंदखेड राजा-मेहकर मार्गावर दुसरबीड गावानजीक तडेगाव फाट्याजवळ आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. समृध्दी महामार्गावर काम करण्यासाठी लोखंडी सळई आणि मजुरांना घेऊन जाणार्‍या टिप्परला हा अपघात झाला. या अपघातात 13 मजुरांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागपूर ते मुंबई दरम्यान होऊ घातलेल्या समृध्दी महामार्गाचे काम झपाट्याने सुरु आहे. महामार्गाचे काम करण्यासाठी दररोज हजारो मजूर येथे काम करत आहेत. आज सकाळी समृध्दी महामार्गाच्या कामासाठी उभारलेल्या तडेगाव येथील कॅम्पकडे एक टिप्पर 16 मजूर आणि त्यात लोखंडी सळई घेऊन जात होता. यावेळी समोरुन आलेल्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात टिप्पर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टिप्पर पलटून भीषण अपघात झाला. या अपघातात काही मजूर दुरवर फेकले गेले. यात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच किनगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी अपघातातील जखमींना जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र यातील 5 जखमीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर 3 गंभीर मजुरांवर रुग्णालयात उपचार सुरु असून यात टिप्पर चालक व वाहकाचा समावेश आहे. अपघातामधील गंभीर जखमी मजूर आणि मृत मजूर हे मध्य प्रदेश आणि बिहारमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button