breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

हरियाणात खाणकामाच्या ठिकाणी भीषण दुर्घटना; भूस्खलनामुळे अनेकांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची भीती

नवी दिल्ली |     

हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यात खाणकामाच्या ठिकाणी मोठा दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. दादम मायनिंग झोनमध्ये झालेल्या या दुर्घटनेत सुमारे १२ वाहने गाडली गेली आहेत. तर जवळपास १५ जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय काही जणांचा मृत्यीू झाल्याची माहिती समोर येत असून अद्यापपर्यंत निश्चित संख्या समजलेली नाही. घटनास्थळी मदतकार्यात प्रशासकीय कर्मचारी गुंतले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दादम मायनिंग झोनमध्ये डोंगराच्या मोठ्या भागाला तडे गेल्याने ही दुर्घटना घडली आहे. डोंगराला तडे गेल्याने सुमारे १२ वाहने ढिगाऱ्याखाली दबली गेली. सध्या घटनास्थळी प्रसारमाध्यमांच्या आणि सर्वसामान्यांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. हरियाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत काहीजण जखमी झाले असून अनेकजण बेपत्ता असल्याची माहिती आहे.

भिवानीमध्ये दरड कोसळल्यानंतर हरियाणाचे मंत्री जेपी दलाल घटनास्थळी पोहोचले आहेत. जेपी दलाल यांनी सांगितले की, “काही लोकांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर येत आहे, परंतु निश्चित संख्या समजलेली नाही. आतापर्यंत काही जणांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. आणखी काहीजण ढिगाऱ्याखाली असू शकतात. डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. आम्ही जास्तीत जास्त लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत.”

भिवानी येथील अपघातावर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री म्हणाले, “भिवानीतील दादम खाण परिसरात झालेल्या भूस्खलनानच्या घटनेने दु:ख झाले आहे. जलद बचाव कार्य आणि जखमींना तातडीने मदत मिळावी यासाठी मी स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे.”

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button