breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वास्तवातील नवदुर्गा आमदार बनसोडे यांच्या हस्ते सन्मानित

पिंपरी – पिंपरी चिंचवड नवरात्रोत्सवानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील नवदुर्गांचा (महिलांचा ) प्रतिनीधीक स्वरूपात आमदार बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या या आधुनिक नवदुर्गाना सन्मानित करत त्यांच्या कार्याचे कौतुक देखील यावेळी करण्यात आले. यामध्ये महिला वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या डॉक्टर, परिचारिका, महिला वाहतूक पोलीस, रिक्षाचालक महिला, शिक्षक महिला, पीएमपीएल वाहन चालक महिला, सफाई कर्मचारी महिला, सुरक्षा रक्षक महिला, पत्रकार महिला आदी नवदुर्गांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.

शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायणी, कालरात्रि, महागौरी, सिद्धिदात्री या मनुष्यातील ऊर्जेची वेगळेवेगळी रुप असल्याचे म्हटले जाते. अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंतचे अत्यंत विलक्षण आणि अद्भूत असे नऊ दिवसांचे महापर्व मानवाच्या अंतरिक ऊर्जेच्या विभिन्न प्रकारांचे प्रतिनिधित्व करते. याच ऊर्जेला नऊ देवींच्या शक्तीची उपमा दिली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायणी, कालरात्रि, महागौरी, सिद्धिदात्री या मनुष्यातील ऊर्जेची वेगळेवेगळी रुप असल्याचे म्हटले जाते. नवदुर्गा याचं खास वैशिष्ट्य…

कोण आहेत नवदुर्गा?

अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंतचे अत्यंत विलक्षण आणि अद्भूत असे नऊ दिवसांचे महापर्व मानवाच्या अंतरिक ऊर्जेच्या विभिन्न प्रकारांचे प्रतिनिधित्व करते. याच ऊर्जेला नऊ देवींच्या शक्तीची उपमा दिली जाते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायणी, कालरात्रि, महागौरी, सिद्धिदात्री या मनुष्यातील ऊर्जेची वेगळेवेगळी रुप असल्याचे म्हटले जाते

नवदुर्गाचे प्रथम स्वरुप असलेली शैलपुत्री देवी तिच्या त्रिशुलाप्रमाणे त्रीलक्ष्य, धर्म, अर्थ आणि मोक्ष यांसह मनुष्याच्या मूलाधार चक्राचे सक्रीय बळ आहे. तर, बह्मचारिणी देवी आपल्या कमंडलू म्हणजेच पूर्व कर्म, प्रारब्ध आणि हातातील माळ म्हणजे नवनीत कर्म यांसह कुंडलिनी शक्तीचे प्रतिनिधित्व करत स्वाधिष्ठान चक्रची शक्ती आहे. आपल्यातील मणिपूर चक्र अर्थात नाभी चक्राची ऊर्जा असलेली चंद्रघंटा देवी जीवनात अनेक उत्तम क्षण आणि ब्रह्मांड ध्वनींसह हातातील कमळाच्या रुपात चिखलातही पवित्रता आणि स्निग्धतेच्या माध्यमातून अनेक लक्ष्य साध्य करण्यासाठी लागणाऱ्या एकाग्र आणि एकत्रितपणाचे द्योतक आहे. अनाहत चक्र म्हणजेच हृदय चक्र गतिशील, ऊर्जा प्रवाहित करणारी कुष्मांडा देवी हातातील शस्त्र, कमंडलू, पुष्प, अमृत, कलश, चक्र व गदा यांसह धनुष्यबाण यांसारख्या अनेक सिद्धी आणि निधींना एकत्रित करून लक्ष्याकडे अग्रेसर होण्याचे संकेत देते. विशुद्ध चक्र म्हणजेच कंठ चक्राची क्रियाशील शक्ती असलेली स्कंदमाता आपल्या हातातील पंकजाच्या रुपात एका केंद्रस्थानी चेतनाचा विस्तार परिलक्षित करते.

आज्ञा चक्राच्या ऊर्जेला कात्यायणी म्हटले जाते. आपल्या तलवारीच्या धारेप्रमाणे जीवात्माला आपल्या तत्व शब्दांनी बांधून परम चेतना सद्गुरू म्हणजेच परमात्म्यात एकरूप होण्याची प्रेरणा देते. कालरात्रि मुख्यत्वे करून सहस्रार चक्राचा पाया मानली जाते. आपल्या कृपाणाने सर्व बंधनातून मुक्त करत काल म्हणजे समय ज्याला ईश्वर मानले गेले आहे, त्यांची सहमती आणि कृपा प्रदान करून स्थूल शरीराच्या पुढे जाण्यासाठी कालरात्रि प्रेरित करते. महागौरी सहस्राचाराची मध्यशक्ती आहे. अभय मुद्रा, वर मुद्रा, डमरू मुद्रा आणि शूल यांच्या माध्यमातून महाध्वनी अर्थात परम नादाला जोडण्यास सहाय्यक होते. सहस्राचाराची उच्च ऊर्जा सिद्धिदात्री आपल्या अष्टसिद्धी, अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्यप, ईशित्व आणि वशित्व यांच्या मदतीने मोक्षाची गती प्रदान करते.

झालेल्या कार्यक्रमावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार अण्णा बनसोडे म्हणाले की, महिलांचा सन्मान हाच समाजाचा अभिमान असून, स्त्री शक्ती जन्मापासूनच वेगवेगळ्या रुपात आपल्यावर संस्कार करत असते ज्याचा उपयोग आपल्याला आयुष्यभर समाजात वावरताना होत असतो त्यामुळे आज हा सन्मान सोहळा आयोजित केल्याचा विशेष आनंद होत आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या या आधुनिक नवदुर्गापासून आपण सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे. त्यांचे कार्य खरचं कौतुकास्पद आहे. आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन आजपासून आम्ही जोमाने समाजातील विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडू अशी शपथ या नवदुर्गांच्या प्रतिनिधीनी घेतली .

यावेळी महिला डॉक्टर, डॉ. छाया शिंदे , अधिपरिचारिका सौ. भाग्यश्री पवार , महिला वाहतूक पोलीस सौ सुरेखा काळे , रिक्षाचालक महिला सौ.रोहिणी दुरगव , शिक्षक महिला सौ. नीलिमा मोरे , पीएमपीएल वाहन चालक महिला हेमलता पाडाळे , सफाई कर्मचारी महिला सौ. गोजाबाई गावडे , सुरक्षा रक्षक महिला सौ. कल्पना आढाव , पत्रकार महिला सौ. शबनम सय्यद , रिक्षा चालक सौ. कोमल ओव्हाळ . आदी नवदुर्गा प्रतिनिधींनी उपस्थित राहून सन्मान स्वीकारला .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button