TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदागरमधील विविध सोसायटीत होळी आणि धुलीवंदन उत्सव धुमधडाक्यात साजरा

पिंपरी | पिंपळे सौदागर येथील विविध सोसायटीत होळी आणि धुलीवंदन सण आज मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. लहानांबरोबरच मोठ्यांनी एकमेकांना रंग लावून, रंगाची उधळण करत, आनंदोत्सव साजरा केला.

परिसरातील रोझ आयकॉन सोसायटी, कुणाल आयकॉन, जरवरी, रोसलँड, लक्षदीप पॅलेस, राजवीर पॅलेस, अलको सोसायटी, दीपमाला अशा विविध सोसायट्यांमध्ये व उन्नति सोशल फाउंडेशन येथे ज्येष्ठ नागरिक व आनंद हास्य क्लब सोबत खास धुलीवंदनासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मोठ्या संख्येने नागरीक उत्सवात सहभागी झाले होते.
उन्नती सोशल फाउंडेशन तथा भाजपा चिंचवड विधानसभा महिला मोर्चाच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी परीसरातील प्रत्येक सोसायटीत प्रत्यक्ष जाऊन नागरिकांना होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच होळी आणि रंगांचे महत्व नागरिकांना पटवून दिले. सोसायटीतील नागरीक उत्सवानिमित्त एकत्र येत एकजुटीचे दर्शन घडवितात. त्यामुळेच खरी एकजुटीची भावना वाढीस लागते. ऐकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते, असे मत यावेळी कुंदाताई भिसे यांनी व्यक्त केले. तसेच केमिकलऐवजी नैसर्गिक रंगांनेच धुळवड साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

रोस लँड सोसायटीमधील रमेश सारडा म्हणाले, उन्नती सोशल फाउंडेशन दरवर्षी पर्यावरणपुरक होळी साजरी करण्यावर भर देते. रंगांशिवाय हा सण अपूर्ण आहे. बाजारात मिळणार्या रंगांमध्ये रसायनांचा वापर केला जातो. नैसर्गिकरित्या होळीसाठी रंग तयार केले पाहिजेत.या रंगांचा होळीमध्ये वापर केल्यामुळे शरीराला काहीच हानी पोहचत नाही. त्यामुळेच होळीसुद्धा खूप आनंदी आणी आरोग्यदायी साजरी होऊ शकते.व आज कुंदाताई बऱ्याच सोसायट्यांमध्ये जाऊन आम्हा सर्वा नागरिकांना शुभेच्छा व आमच्या सोबत धूलिवंदन साजरा केल्याबद्दल आम्हाला याचा खूप आनंद झाला व आल्याबद्दल कुंदाताईंचे खूप खूप आभार.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button