breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

हॉकी : ४१ वर्षांनी भारताला सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी

टोकियो – भारत आणि ग्रेट ब्रिटन पुरुष हॉकी संघ आज एकमेकांना क्वार्टर फायनलमध्ये भिडणार आहेत. उभय संघांमधील हा सामना आज संध्याकाळी साडेपाचपासून ऑलिम्पिक स्टेडियममध्ये खेळला जाईल.

भारताला ४१ वर्षांनंतर सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी आहे. शेवटच्या वेळी १९८० मध्ये भारतीय संघ टॉप -४ मध्ये पोहोचला होता. त्यानंतर भारताने फायनलमध्ये प्रवेश करून सुवर्णपदकही पटकावले होते. त्यानंतर संघ कधीही टॉप -४ मध्ये पोहोचू शकला नाही. ८ वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन राहिलेल्या भारतीय हॉकी संघाला इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची उत्तम संधी यंदा आहे.

भारतीय पुरुष हॉकी संघ जागतिक क्रमवारीत सध्या ३ -या क्रमांकावर आहे. तर ग्रेट ब्रिटन ६ व्या क्रमांकावर आहे. ऑलिम्पिकमध्ये दोन्ही संघ आठ वेळा आमनेसामने आले आहेत. भारत आणि ब्रिटन या दोघांनी ४-४ सामने जिंकले आहेत.

टीम इंडिया सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. संघाने पूल स्टेजमध्ये ५ पैकी ४ सामने जिंकले. यादरम्यान, भारताने २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिना संघाचाही पराभव केला. टीम इंडियाला केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा धक्का सहन करावा लगला.ब्रिटन संघाने पूल स्टेज मध्ये ५ पैकी फक्त २ सामने जिंकले आहेत. या संघाला जर्मनीने पराभूत केले. तर नेदरलँड आणि बेल्जियमविरुद्धचे सामने बरोबरीत सुटले.

२०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारत आणि ब्रिटन दोन वेळा आमनेसामने आले होते. त्यानंतर भारताने ग्रुप स्टेज मध्ये ब्रिटनचा ४-३ असा पराभव केला. मात्र, यानंतर कांस्यपदकाच्या लढतीत इंग्लिश संघाने भारताचा २-१ असा पराभव केला.ग्रेट ब्रिटनने १९८८ च्या सोल ऑलिम्पिकनंतर हॉकीमध्ये पदक जिंकले नाही. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये संघाला कांस्यपदकाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला.

१९४८ च्या ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात भारताचा आणि ब्रिटनशी सामना झाला. त्या सामन्यात भारताने इंग्लिश संघाला हरवून सुवर्णपदक जिंकले. हे स्वतंत्र भारताचे पहिले सुवर्णपदक होते.यानंतर भारतीय संघाने १९५२ आणि १९६० च्या ऑलिम्पिकच्या बाद फेरीत ग्रेट ब्रिटनचा पराभव केला. याशिवाय १९७२ च्या ऑलिम्पिकच्या ग्रुप स्टेज मध्ये भारताने ब्रिटनचा पराभव केला.

भारतीय पुरुष हॉकी संघाने आतापर्यंत ८ सुवर्णपदके जिंकली…
भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके जिंकली आहेत. संघाने १९२८, १९३२, १९३६, १९४८, १९५२, १९५६, १९६४ आणि १९८० ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदके जिंकली. तर १९६० मध्ये रौप्य आणि १९६८ आणि १९७२ मध्ये कांस्य पदक जिंकले. १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकनंतर भारताने हॉकीमध्ये एकही पदक जिंकले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button