breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुण्यातील ‘त्या’ घटनेची हिंजवडीत पुनरावृत्ती; फूटपाथवरील होर्डिंग्जचा प्रश्न ऐरणीवर

पिंपरी |महाईन्यूज|

वादळी वाऱ्यासह सोमवारी सायंकाळी अचानक पावसाला सुरुवात झाल्याने पिंपरी चिंचवड परिसरात नागरिकांची धांदल उडाली आहे. मात्र, सुसाटाच्या वा-यामुळे आय.टी. पार्क असलेल्या हिंजवडीतील विप्रो सर्कल परिसरात मोठा होर्डिग्ज कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत होर्डिंगच्या कचाट्यात सापडलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतू, पुण्यातील त्या दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली असून पिंपरी चिंचवड शहरातील फूटपाथवर लावलेल्या अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हिंजवडी आय टी पार्क परिसरात सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यानंतर अचानक वादळीवाऱ्याला सुरुवात झाली. त्यामुळे परिसरातील काही झाडंही उन्मळून पडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोडींही झाली. याशिवाय हिंजवडी परिसरातील अत्यंत वर्दळीचं ठिकाण असणाऱ्या विप्रो सर्कल रस्त्याच्या बाजूला असलेलं एक मोठं होर्डिंग रस्त्यावर कोसळलं आहे. यावेळी रस्त्यावर थोडी विरळ गर्दी होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

पण या होर्डिंगच्या कचाट्यात आलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच मोठं नुकसान झालं आहे. या घटनेनं दोन वर्षांपूर्वी पुण्यातील जुना मार्केट परिसरात पडलेल्या होर्डिंगची पुन्हा आठवण झाली आहे. त्यावेळी होर्डिंग कोसळून चार जणांचा जीव गेला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. आज या घटनेची पुनरावृत्ती हिंजवडी परिसरात झाली आहे. मात्र सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. खरंतर अशा प्रकारचे अनेक होर्डिंग्स या परिसरात आहेत. हे होर्डिंग्स लोखंडी असल्यानं ते कुजलेली देखील आहेत. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अशा अवैध होर्डिंग्सवर कारवाई करणं आवश्यक आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात पादचारी मार्गासह अनेक चाैकाचाैकात अनधिकृतपणे काही राजकीय नगरसेवकांनी, एका आकाशचिन्ह परवाना विभागातील सेवानिवृत्त लिपिकाने होर्डिग्ज उभारले आहेत. मुळात पादचारी मार्ग नागरिकांच्या रहदारीचे असतात. परंतू, त्यावर अतिक्रमण करीत शेकडो होर्डिग्ज फुटपाथवर उभारले आहेत. ते होर्डिग्ज तातडीने हटविण्याची मागणी होवू लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button