breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

विजय सेतूपतीच्या ’96’ चा येतोय हिंदी रिमेक

मुंबई – दाक्षिणात्य चित्रपट विश्वामध्ये ज्य़ा चित्रपटानं बॉलीवूडमधील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं अशा 96 चित्रपटाचा आता हिंदी रिमेक येणार आहे. टॉलीवूडमधल्या चित्रपटांचा हिंदीत रिमेक येणं ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र त्यातल्या त्यात काही प्रसिद्ध चित्रपटांच्या रिमेकची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत असतात. 96 ची जादू तरुणाईच्या मनावर कायम आहे. मुळच्या तमिळ भाषेतील या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यात विजय सेतूपती आणि त्रिशा यांची प्रमुख भूमिका होती. शाळेच्या दिवसांतील आठवणी, त्यावेळचं प्रेम, बऱ्याच वर्षांनंतर मित्रांचं होणार रियुनियन या साऱ्या गोष्टी प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आले होते. त्यातील गाणी, संवाद, कथा, छायाचित्रण आणि अभिनय प्रेक्षकांना कमालीचा भावला होता.

सी प्रेमकुमार यांनी 96 चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. वेगवेगळ्या वयातील प्रेक्षकांना या चित्रपटानं निखळ आनंद दिला होता. त्याच्याविषयी प्रेक्षक सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना दिसतात. निर्माता अजय कपूर यांनी आपण 96 चित्रपटाचा हिंदी रिमेक तयार करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी यापूर्वी अकबर वॉल्टर, पटाखा, अॅटक नावाचे चित्रपट केले आहेत. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 96 ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. दोन शाळकरी विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट विजय आणि त्रिशाच्या अभिनयामुळे मोठ्या उंचीवर जाऊन पोहचला होता. शाळेत असताना झालेलं प्रेम पूर्णत्वाला जाते की नाही या प्रश्नाचा वेध 96 मधून घेण्यात आला होता. 96 च्या हिंदी रिमेकबद्दल विजय सेतूपतीनं व्टिट करुन माहिती दिली होती. अजय कपूर यांनाही 96 च्या हिंदी रिमेकबद्दल कमालीची उत्सूकता आहे. विजय सेतूपतीनं म्हटलं होतं, एक कलाकार म्हणून 96 मध्ये काम करणं हा माझ्यासाठी मोठा आनंद होतां. या चित्रपटाच्या निमित्तानं मला मोठं यश मिळालं. आता अजय या चित्रपटाचा रिमेक तयार करणार आहेत. त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button