ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिना रब्बानी खार ते नवीद कमर; पाकच्या मंत्रिमंडळात ‘या’ नेत्यांची वर्णी?

इस्लामाबाद |  पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होणार आहे. तसंच, सिनेटचे अध्यक्ष सादिक संजरानीदेखील आज शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर आज ३४ मंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे. शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळात कोणाला मंत्रिपद मिळणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.

शाहबाज यांच्या मंत्रिमंडळात ३४ मंत्र्यांचा समावेश आहे. रियाज पीरजादा, मुर्तजा जावेद अब्बासी, आजम नजीर तरार, खुर्शीद शाह, नवीम कमर, शेरी रहमान, कादिर पटेल, शाजिया मुर्री, मुर्तजा महमूद, साजिद हुसैन यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेत्या हिना रब्बानी खार, मुस्ताफी नवाज खोखर यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. पीएमएल- क्यूचे नेता तारिक बसीर चीमा यांनही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पीएमएल-एनचे आयेशा पाशा, अब्दुल रहमानही मंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) पक्षनेतृत्व सर्व सहकारी पक्षांना केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करता यावे आणि त्यांना त्यांच्या पसंतीचे खाते मिळावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे दोन्ही पक्षांतील सूत्रांनी सांगितले. सत्ताधारी आघाडीमध्ये आठ राजकीय पक्ष आणि चार अपक्ष आहेत. शरीफ हे अवघ्या दोन मतांच्या फरकाने पंतप्रधान झाले असल्याने त्यांना त्यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच सर्व सहकारी पक्षांमध्ये कोणताही गैरसमज पसरवू द्यायचा नाही. त्यामुळे ते सावध पावले उचलत आहेत. विशेषत: पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे आघाडी सरकारची सोबत सोडून आलेल्या लोकांना त्यांना सोबत घेऊन जायचे आहे. पाकिस्तानच्या ३४२ सदस्यसंख्येच्या संसदेत १७४ मते मिळवून शाहबाज हे पंतप्रधान झाले आहेत. सत्ताधारी आघाडीतील दुसऱ्या क्रमांकावरील ‘पीपीपी’मध्येच अंतर्गत मतभेद असल्याने ते केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्यास उत्सुक नसल्याचे समजते.

पीओकेच्या ‘पंतप्रधान’पदी सरदार इल्यास नियुक्त

पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या पंतप्रधानपदी सरदार तन्वीर इल्यास यांची सोमवारी निवड करण्यात आली. इल्यास हे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए तालिबान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सरदार अब्दुल कय्यूम नियाझी यांनी राजीनामा दिल्याने पंतप्रधानपदासाठी निवडणूक घेण्यात आली. विरोधी पक्षांनी त्यावर बहिष्कार टाकला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button