breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

हेरिटेज वॉक! आता पर्यटकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीतही फेरफटका मारता येणार

मुंबई – मुंबई एक स्वप्ननगरी आहे, असे म्हटले जाते. या स्वप्ननगरीत अशी काही स्मारकेही आहेत ज्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मुंबईतील अशा ऐतिहासिक स्मारकांची वस्तूंची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालय आणि पर्यटक मार्गदर्शक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन संचालनालय यांचा संयुक्त विद्यमाने आज शनिवार १६ ऑक्टोबरपासून पर्यटकांना मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत.

त्यामुळे पर्यटक आता शनिवार आणि रविवारी सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाला भेट देऊ शकतील. याठिकाणी एक तास वेळ घालवता येणार आहे. पर्यटकांना हेरिटेज वॉकचा अनुभव घेता येणार आहे. मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये एकूण ३ हेरिटेज वॉक आयोजित केले जातील. त्यामध्ये भारतीय पर्यटकांना १०० रुपये आणि परदेशी पर्यटकांना २०० तिकीट आकारले जाणार आहे. पर्यटकांनी “बुकमायशो डॉट कॉम’ वर तिकीट बुक करणे आवश्यक आहे.

मुंबई उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुन्या उच्च न्यायालयांपैकी एक आहे. उच्च न्यायालयाच्या अधिनियम, १८६१ अंतर्गत १४ ऑगस्ट १८६२ रोजी हे स्थापन करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या सध्याच्या इमारतीचे काम एप्रिल १८७१ मध्ये सुरू झाले व नोव्हेंबर १८७८ मध्ये पूर्ण झाले. १९ व्या शतकात ब्रिटिशांनी नेत्रदीपक आणि लक्षवेधी अशा गॉथिक पुनरुज्जीवन शैलीमध्ये ही इमारत साकारली होती. ही इमारत व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको एन्सेम्बल ऑफ बॉम्बेचा भाग आहे, जी २०१८ मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत जोडली गेली. या इमारतीचे मुख्य आकर्षण असलेल्या संग्रहालयामध्ये आंतरिक रचना न्यायालयाच्या खोलीप्रमाणे आहे. ही जागा जुनी कायदेशीर रोल, वकिलांची पोर्ट्रेट आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या एका कोपऱ्यात असलेल्या वजा मॉडेलसह तयार केली गेली आहे.

१८९० सालातील कायद्याच्या अभ्यासासाठी महात्मा गांधी यांचा अर्ज आणि वल्लभभाई पटेल यांचे प्रमाणपत्र आणि पदवीसह त्यांचे १८९१ चे प्रमाणपत्र देखील येथे बघायला मिळणार आहे.

दरम्यान, प्रधान सचिव वल्सा नायर सिंह म्हणाल्या, “उच्च न्यायालयाचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तुकला याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी, महाराष्ट्र पर्यटन विभाग, मुंबई उच्च न्यायालय आणि पर्यटक मार्गदर्शक संघटन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. तर या संघटनेच्या अध्यक्ष जेरू भरुचा म्हणाल्या, “बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यांसारख्या महान व्यक्तींनी या ठिकाणी कामकाज केले आहे आणि पर्यटकांना अभिमान वाटला पाहिजे की त्यांना या सुंदर वस्तूंमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळत आहे. आम्ही टूर मार्गदर्शकांची व्यवस्था केली आहे जे पर्यटकांना हिंदी, मराठी आणि इंग्रजीमध्ये मार्गदर्शन करतील.

हेरिटेज वॉक गेट क्रमांक ४ पासून सुरू होईल, जिथून त्यांना न्यायाधीश ग्रंथालय, सेंट्रल कोर्ट हॉल क्रमांक ४६, न्यायमूर्ती एम सी छागला आणि संग्रहालय येथे नेले जाईल. जजेस पोर्च येथे वॉक संपेल. गाईडद्वारे इमारतीच्या वास्तुकलेबद्दल सर्व माहिती दिली जाईल आणि पर्यटकांना निवडक ठिकाणी छायाचित्र घेण्याची परवानगी असेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button