आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमुंबई

सूरज चव्हाण लवकरच मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला

बिग बॉस स्पर्धक सूरज चव्हाणच्या जीवनावर आधारित 'झापूक झूपूक' सिनेमा

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण आता मराठी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. सूरज चव्हाण लवकरच मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या आगामी सिनेमाचे नाव ‘झापूक झुपूक’ असे आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. नुकताच या सिनेमाचा टीझरचा प्रोमो व्हायरल झाला आहे. हा प्रोमो पाहून नेटकरी हैराण झाले आहेत.

सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपूक’ हा चित्रपट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाच्या प्रोमो टीझरमध्ये सुरुवातीला कोणाच्या तरी लग्नाची वाजत गाजत वरात दिसत आहे. सूरज चव्हाण या वरातमीध्ये नाचताना दिसत आहे. त्यानंतर तो चिडलेला दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा प्रोमो चर्चेत आहे.

हेही वाचा –  राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे गाथा सन्मानाची-कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव!

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

नेटकरी सूरज चव्हाणच्या ‘झापूक झुपूक’सिनेमाचा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहे. एका यूजरने, ‘केदार शिंदे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘फक्त छपरी पोरं हा सिनेमा पाहायला जाणार’ अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने, ‘जेव्हा भविष्यात मराठी चित्रपटसृष्टी अस्त होण्याच्या कारणांचा शोध घेतला जाईल – तेव्हा एक महत्वाचे पान या सिनेमावर आणि जिओवर असेल’ असे म्हटले आहे. एका यूजरने तर चित्रपट ३०० ते ४०० कोटी रुपये कमावणार अशी भविष्यवाणी केली आहे.

कधी होणार सिनेमा प्रदर्शित?

सूरज चव्हाणसोबत या चित्रपटात अनेक मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे. जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटात एक धमाल लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २५ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी चित्रपटाचा टीझर प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोवर अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button