आरोग्य

पावसाळ्यात होणाऱ्या ॲलर्जीला कसा प्रतिबंध कराल? वेळीच लक्ष द्या नाहीतर… जाणून घ्या!

Health : पावसाळ्याच्या ऋतूमध्ये अनेक आजार पसरतात. यामध्ये बुरशी संसर्गामुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांचाही समावेश आहे. अस्थमा आणि ब्राँकायटिसची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत.हवेतील परागकण, धुलीकण आणि ओलसरपणामुळे ॲलर्जीची समस्या उद्भवते. एखाद्या व्यक्तीला अशा ॲलर्जीमुळे दमा, ब्राँकायटिस, ॲलर्जीक राईनाइटिस आणि परागज्वर होण्याचा धोका अधिक असतो.

लर्जीचे प्रकार कोणते?

बुरशीमुळे होणारी ॲलर्जी : हवेतील दमटपणा आणि ओलावा हे बाथरूम आणि स्वयंपाकघरात बुरशीच्या वाढीस कारणीभूत ठरते. शिंका येणे, खोकला येणे, डोळ्यातून पाणी येणे आणि श्वासोच्छवासाची समस्या यासारखी लक्षणे आढळतात.

धुलीकण: खाज सुटणे, छातीत घरघर होणे आणि त्वचेवर पुरळ उठणे यासह ॲलर्जीक प्रतिक्रिया आढळून येते.

परागकण: हे ॲलर्जीस कारणीभूत ठरते आणि नाक चोंदणे, घश्याला खाज सुटणे आणि डोळयातून पाणी येणे अशी लक्षणे दिसून येतात.

ॲलर्जीचे निदान : ॲलर्जीचा शोध घेण्यासाठी स्पायरोमेट्री (फुफ्फुसाचे कार्य चाचणी) आणि ब्रोन्कोप्रोव्होकेशन चाचणी, एक्स-रे, शारीरिक तपासणी आणि रक्त चाचण्या केल्या जातात. तज्ज्ञांकडून वैद्यकीय इतिहास जाणुन घेतला जाईल आणि विशिष्ट ऍलर्जीचे निदानाकरिता लक्षणांचा अभ्यास केला जातो. वेळीच योग्य उपचार सुरू केल्यास भविष्यातील त्रास कमी होतो.

हेही वाचा   –      Pune | पीएमपी कर्मचाऱ्यांचा संप, पुणेकरांची मोठ्याप्रमाणात गैरसोय

उपचार : या स्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला तज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावी लागतील. स्वत: च्या मर्जीने औषधोपचार करणे धोकादायक ठरु शकते. पावसाळ्याच्या दिवसात ॲलर्जीचा धोका टाळण्यासाठी खाली दिलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करा.

घराची नियमित साफसफाई केल्यास ॲलर्जीची समस्या टाळता येते. घरात हवा खेळती राहिल हे सुनिश्चित करा आणि बुरशीची वाढ रोखण्यासाठी ह्युमिडिफायर वापरा. घर स्वच्छ आणि ॲलर्जी-मुक्त ठेवण्यासाठी HEPA फिल्टरसह व्हॅक्यूम क्लिनर निवडून नियमितपणे व्हॅक्यूम करा आणि घरात धूळ जमा होऊ देऊ नका.

बुरशी संसर्ग टाळण्यासाठी, बाथरूम, स्वयंपाकघर आणि तळघरांमधील ओलसरपणा दूर करा. घरामध्ये लाकडी फर्नीचर, भिंतीत ओलावा राहणार नाही याची खात्री करा.

घरातील झाडे बुरशी आणि परागकणांना कारणीभूत ठरु शकतात. त्यांना वेळोवेळी स्वच्छ करा आणि नियमितपणे पाणी बदला. ॲलर्जीची शक्यता कमी करण्यासाठी सतत हात धुवा आणि स्वच्छ कपडे परिधान करुन वैयक्तिक स्वच्छता राखा. लक्षात ठेवा की घरी पाळीव प्राणी देखील ॲलर्जीस कारणीभूत ठरु शकतात.

सर्दी, खोकला आणि शिंका येणे यासारखी लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अँटीहिस्टामाइन्स, डिकंजेस्टंट्स आणि नाकातील कॉर्टिकोस्टिरॉईड्स ॲलर्जी व्यवस्थापित करण्यात मदत करतात. निरोगी राहण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ऍलर्जीचे शॉट्स घ्या.संतुलित आहार आणि शरीर हायड्रेटेड राखल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button