आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

अंडी खाणाऱ्यांसाठी धक्काकायक बातमी समोर

एका अंड्यामध्ये किती कोलेस्ट्रॉल असते?

बरेच लोक असे आहेत जे दररोज अंडी खातात. अंडी खाल्याने शरीराची ताकद वाढते. अंडी स्वस्त आणि पोषक असल्याने ती सहज उपलब्ध होतात. मात्र आता अंडी खाणाऱ्यांसाठी धक्काकायक बातमी समोर आली आहे. जामा नेटवर्कमध्ये प्रकाशित झालेल्या ‘असोसिएशन ऑफ डाएटरी कोलेस्टेरॉल अँड एग कन्झम्पशन विथ इन्सिडेंट कार्डिओव्हस्कुलर डिसीज अँड मॉर्टॅलिटी’ अभ्यासात अंड्यांच्या सेवनाविषयी धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हेही वाचा :  “शरद पवारांचे मानस पुत्र विजय कोलते यांनी अहिल्यांच्या जागा लाटल्या”; प्रा. लक्ष्मण हाके 

नव्या अभ्यासात नेमकं काय आहे?
नवीन अभ्यासात संशोधकांनी असे म्हटले आहे की, दररोज अंडी खाल्ल्याने हृदयरोग आणि मृत्यूचा धोका वाढतो. दररोज अर्धे अंडे खाल्ल्यास 17.5 वर्षांत हृदयरोगाचा धोका 6 टक्के आणि मृत्यूचा धोका 8 टक्के वाढतो. अंड्यातील कोलेस्ट्रॉल हे यामागील कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. शिकागोतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 29615 लोकांवर अभ्यास केल्यानंतर हा अहवाल सादर केला आहे. मात्र या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

एका अंड्यामध्ये किती कोलेस्ट्रॉल असते?
या अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांना सुरुवातीला ते किती अंडी खातात, त्यांचा आहार कसा असतो? किती व्यायाम करतात? याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. ही माहिती गोळा केल्यानंतर त्यांच्या आहाराचे 17.5 वर्षे निरीक्षण करण्यात आले. त्यानंतर 300 मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोगाचा धोका 17 टक्के आणि मृत्यूचा धोका 18 टक्के वाढतो असे समोर आले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार एका अंड्यामध्ये 186 मिलिग्रॅम कोलेस्ट्रॉल असते. हेच कोलेस्ट्रॉल शरीरासाठी घातक असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. यामुळेच या लोकांमध्ये हृदयरोगाचा धोका वाढल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. तसेच तुम्ही दररोज अंडी खात असाल तर त्याचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, अंडी ही उर्जेचा चांगला स्त्रोत आहेत. मात्र या अहवालात अंडी शरीरासाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आहारातील अंड्याचे प्रमाण कमी करण्याची गरज आहे. तसेच तुम्हाला इतरही गोष्टींवर नजर ठेवावी लागणार आहे. तुम्ही काय आहार घेता? किती व्यायाम करता? या गोष्टीही महत्त्वाच्या ठरणार आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button