आरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

भाग्यलक्ष्मी बचत गटाच्या माध्यमातून आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर उत्साहात

आरोग्य शिबिरास ३०० रुग्णांनी लाभ घेतला तर ४० रक्तदात्यांनी केले रक्तदान

पिंपरी-चिंचवडः रक्तदान हे एक जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे. गरजू व्यक्तींना आपले रक्तदान करा आणि त्यांच्यासोबत आपले प्रेमाचे नाते जोडा. रक्तदान हे जगातील सर्वात मोठे पुण्याचे कार्य आहे कारण आपल्या दिलेल्या थोड्याशा रक्ताने कोणाचे तरी प्राण वाचत असतात. हा संदेश देत पिंपरी, महेशनगर येथे रविवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. भाग्यलक्ष्मी बचत गटाच्या अध्यक्षा स्वीटीताई मलातपुरे यांनी आयोजन केले होते. या स्तुत्य उपक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली.

स्वीटीताई मलातपुरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
आरोग्य शिबिरास ३०० रुग्णांनी लाभ घेतला तर ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. आरोग्य शिबीर डीवाय पाटील समूह व रक्तदान शिबिर अक्षय ब्लड बँक यांच्या सहकार्याने घेण्यात आले. शहरात अतिशय नियोजपूर्वक, शिस्तबद्ध पद्धतीने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन निटनेटके केल्याबद्दल भाग्यलक्ष्मी बचत गटाच्या अध्यक्षा स्वीटीताई मलातपुरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांची उपस्थिती…
यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संत तुकारामनगर येथील मा. नगरसेवक योगेशजी बहल, छावा स्वराज्य सेनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पडवळ, भोसरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भास्कर, दत्त मंदिरचे अध्यक्ष बारगलकाका, सामाजिक कार्यकर्त्या राखी धर, डी. वाय पाटील रुग्णालयाचे डॉक्टर मनोजकुमार मुस्ताड, सामाजिक कार्यकर्ते निलेश मलातपुरे, पिंपरी-चिंचवड महा समाज विकास विभाग समूह संघटिका श्रीमती वैशाली अशोक लगाडे, पिंपरी-चिंचवड महा व महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत सहयोगिनी वनिता श्रीपाद कांबळे, वंडरफुल प्री स्कूल प्रिन्सिपल ममता जोशी आदी मान्यवरांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली.

कार्यक्रमास यांची उपस्थिती…
सामाजिक कार्यकर्ते सतीश भाऊ लांडगे, नगरसेविका सुजाताताई पालांडे, नगरसेविका सुलक्षणा शीलवंत (धर), उद्योजक प्रदीप भोसले, सुधीर घाडगे, ज्ञानेश्वर त्रिंबके, सामाजिक कार्यकर्ते अजय चव्हाण, हेमंत मोरे, रोहन समुद्रे, विनोद कांबळे आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमास यांचे लाभले सहकार्य
उन्नती महिला बचत गट- वर्षा गायकवाड, जिजाऊ महिला बचत गट- निशा पडवळ, श्रेया महिला बचत गट-उमा काकडे, दत्त कृपा महिला बचत गट-अश्विनी कपोते, दिगंबर महिला बचत गट-छाया मराठे, जिजाई महिला बचत गट-प्रणाली गायकवाड, रागिणी महिला बचत गट-कविता कोळी, हिरकणी महिला बचत गट-बानू शेख, धनलक्ष्मी महिला बचत गट-वैशाली पडवळ, यशश्री महिला बचत गट- हसिना शेख, उन्नती महिला बचत गट- गुलजार सय्यद, वर्षा महिला बचत गट- राधिका शिंदे या बचत गटाच्या प्रमुखांचे कार्यक्रम यशस्वीततेसाठी योग्य सहकार्य लाभले. आपल्या खुमासदार शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रजनीताई सूर्यवंशी यांनी केले तसेच आभारही मानले.

रक्तदान हेच जीवनदान आहे. रक्तदानाप्रति जागरुकता वाढवणे जरुरीचे आहे. तसेच गरजूंना वेळेवर, सुरक्षित आणि योग्य रक्त मिळावे यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. आपण सर्वांनीच रक्तदान करायला हवे, मग ते कुणाहीसाठी असो.
– स्वीटीताई मलातपुरे

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button