breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे, मुख्याध्यापकाला ‘पोक्सो’अंतर्गत अटक

चंद्रपूर |

शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करीत असल्याप्रकरणी मुख्याध्यापकाला ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून अटक केली. मात्र पोलिसांनी तपास सुरू केला असता सातपेक्षा अधिक विद्यार्थिनींसोबत या मुख्याध्यापकाने असा घृणास्पद प्रकार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हय़ात सोमवारपासून शाळा सुरू होताच काही गावकरी जाब विचारण्यासाठी शाळेत गेले होते. तेव्हा मुख्याध्यापकाने स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले आणि पोलिसांकडे संरक्षण मागितले. पोलीस पोहोचताच मुख्याध्यापकाचेच बिंग फुटले. हा मुख्याध्यापक वर्षभरापासून अल्पवयीन विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करीत असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने बल्लारपूर पोलिसांनी सांगितले.

मुख्याध्यापक पुस्तक वाटप वा अन्य कारणाने विद्यार्थिनींना शाळेत बोलावत होता. अशातच तो विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करायचा. ही बाब एका विद्यार्थिनीने आपल्या पालकाला सांगितली. या पालकाने गावकऱ्यांना सांगितली. मुख्याध्यापक वर्गातील इतर विद्यार्थ्यांना साफसफाईच्या बहाण्याने बाहेर पाठवत होता. अशातच पाचव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला वर्गात ठेवून तिच्याशी अश्लील चाळे करायचा. प्रकरण बाल अत्याचाराशी संबंधित असल्याने विशेष तपास पथक गठित करण्यात आले आहे. या पथकाचे प्रमुख राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार आहे. पथकात पोलीस निरीक्षक उमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक नेहा सोळंके, गुन्हे शोध पथक प्रभारी व्ही.आर. गायकवाड यांचा समावेश आहे. किती मुलींवर अत्याचार झाला याचा शोध हे पथक घेणार आहे. – अरविंद साळवे, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button