पिंपरी / चिंचवड
पत्नीचे अनैतिक संबंध समजल्याने चाकूने गळा कापून केला पत्नीचा खून
पिंपरी | प्रतिनिधी
पत्नीचे अनैतिक संबंध पतीला समजल्याने पतीने पत्नीचा चाकूने गळा कापून खून केला. ही घटना मंगळवारी (दि. 12) पहाटे पाच वाजता मेदनकरवाडी येथे घडली.
अश्विनी सचिन काळेल (वय 25, रा. मेदनकरवाडी, ता. खेड. मूळ रा. सातारा) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. सचिन रंगनाथ काळेल (वय 30) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी हनुमंत भिकाजी मेदनकर (वय 53, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन आणि त्याची पत्नी मेदनकरवाडी येथे फिर्यादी यांच्या खोलीत भाड्याने राहत होते. सचिन याला त्याची पत्नी अश्विनी हिचे अनैतिक संबंध असल्याचे समजले. त्या कारणावरून सचिन याने अश्विनीचा गळा दाबला आणि चाकूने गळा कापून तिचा खून केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.