पिंपरी / चिंचवड

‘मी तुमची नोकरी एका मिनिटात घालवू शकतो’ म्हणत पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ

पिंपरी l प्रतिनिधी

मदतीसाठी गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ‘मी तुमची नोकरी एका मिनिटात घालवू शकतो. पोलीस खात्याच्या वरिष्ठ अधिका-यांशी माझी ओळख आहे’ असे म्हणत धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 24) रात्री साडेआठ वाजता रीयानो कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे घडली.

अरविंद शिवाजी पतंगे (वय 37, रा. रीयानो कॉलनी तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुनील तळपे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलिसांना गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजता शरद गजानन कुल्हाट यांचा पोलीस मदतीसाठी फोन आला. त्यामुळे फिर्यादी पोलीस अंमलदार आणि पोलीस नाईक गिरीगोसावी असे दोघेजण रीयानो कॉलनी येथे गेले. त्यावेळी आरोपी अरविंद पतंगे तिथे होता. त्याने पोलिसांना शिवीगाळ करून अरेरावीची भाषा वापरली. फिर्यादी यांच्या शर्टची कॉलर पकडून ‘माझी तुमच्या पोलीस खात्याच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याशी ओळख आहे. मी तुमची नोकरी एका मिनिटात घालवू शकतो. माझ्याशी पंगा घेता. आता तुझी मानच मोडून टाकतो. चला मी पोलीस ठाण्यात येतो आणि तुम्हाला दाखवतो माझा इंगा. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही’ अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी पोलीस ठाण्यात आला. पोलीस ठाण्याच्या अधिकारी कक्षात पोलिसांना जोरजोरात बोलून ‘तुमच्या सर्वांच्या नोक-या घालवतो’ अशी त्याने धमकी दिली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button