पिंपरी / चिंचवड

पत्नीचा खून करून मृतदेह पोत्यात बांधून तळ्यात टाकला

पिंपरी l प्रतिनिधी

तळेगाव दाभाडे येथे खुनाची धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात बांधून घराजवळ असलेल्या तळ्याच्या चारीत लपवला. ही घटना बुधवारी (दि. 23) रात्री साडेसात वाजता कातकरी वस्ती, तळेगाव दाभाडे येथे घडली.

तारा नईम शेख (वय 35) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. पती नईम नसरुद्दिन शेख (रा. कातकरी वस्ती, तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती नईम याने पत्नी तारा हिचा अज्ञात कारणावरून गळा व तोंड दाबून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह पांढ-या पोत्यात भरला. हे पोते आरोपीने त्याच्या घराजवळ असलेल्या तळ्याच्या चारीमध्ये लपवून ठेवले. खून केल्यानंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button