पिंपरी / चिंचवड

पोलिसात तक्रार दिली तरी तो सुधारला नाही ; घरात घुसून तरुणीशी गैरवर्तन

पोलिसांनी केली अटक

पिंपरी l प्रतिनिधी

गैरवर्तन केल्याबाबत तरुणीने पोलिसात तक्रार केली असताना देखील तरुण सुधारला नाही. त्याने रिलेशनशिपमध्ये रहाण्यासाठी जबरदस्ती करत तरुणीच्या घरात जाऊन तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी आरोपी तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना 12 डिसेंबर 2021 रोजी मध्यरात्री वाकड येथे घडली.

याप्रकरणी पीडित तरुणीने 10 फेब्रुवारी 2022 रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिजित मधुकर शिंगन (वय 28, रा. पिंपळे निलख) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांना रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी मागे लागला होता. त्याबाबत फिर्यादी यांनी आरोपीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रार करून देखील आरोपीने पीडित तरुणीचा पाठलाग सोडला नाही. रिलेशनशिपमध्ये राहण्याबाबत मागे लागून त्याने तरुणीच्या घरात जाऊन तिला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत गैरवर्तन करत तरुणीचा विनयभंग केला. पोलीस उपनिरीक्षक राजेश मसाळ तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button