breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
कुलूप तोडून दहा लाख रूपयांचे दागिने चोरीला
पिंपळे सौदागर |
फ्लॅटचे कुलूप तोडून दहा लाख रूपयांचे सोने, चांदीचे दागिने चोरीला गेले. लक्षद्विप पॅलेस, जे बिल्डींग, कुणाल आयकॉन रोड, पिंपळे सौदागर येथे रविवारी (दि.27) पहाटे 4 ते 4.30 दरम्यान ही घटना घडली. आशिष अमृतलाल गटागट (वय 37, रा. अंधेरी वेस्ट, मुंबई) यांनी रविवारी या बाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून तीन अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 457, 380 अंतर्गत घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशिष यांच्या भावाचा राहता फ्लॅट कुलूप लावून बंद होता. तीन चोरटे फ्लॅटचे कुलूप तोडून घरात घुसले. चोरट्यांनी बेडरूममधील 10 लाख रूपये किमतीचे 20 तोळे सोने, 20 तोळे चांदीचे दागिने चोरले आहेत. असे फिर्यादीत नमूद केले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.