पिंपरी / चिंचवड

काठीने मारहाण करून मोबाईल पळवला

पिंपरी l प्रतिनिधी

रस्त्याने पायी चालत जात असलेल्या एका व्यक्तीला लाकडी काठीने बेदम मारहाण केली आणि व्यक्तीचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 26) सायंकाळी सव्वासहा वाजता वासुली येथील जी ई चौक येथे घडली.

विनोद महावीर वठारे (वय 36, रा. रावेत) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शनिवारी सायंकाळी जी ई चौक, वासुली येथून पायी चालत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून दोन अनोळखी चोर आले. चोरट्यांनी फिर्यादी विनोद यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र विनोद यांनी मोबाईल घट्ट पकडून ठेवला. मोबाईल मिळत नसल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी लाकडी काठीने विनोद यांना मारहाण केली. ज्या हातात मोबाईल पकडला होता, त्या हातावर बेदम मारहाण केली. त्यामुळे विनोद यांच्या हातातून मोबाईल खाली पडला. तो मोबाईल उचलून घेत असताना चोरट्यांनी 15 हजारांचा मोबाईल जबरदस्तीने घेऊन पोबारा केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button