breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

हौसेला मोल नाही – पुण्याहून जातेगाव येथे वधुवरांना आणणार हॅलीकॉप्टरने!

करमाळा । प्रतिनिधी
आपल्याकडे नेहमी म्हटले जाते, की “हौसेला मोल नाही” याची साक्षात प्रचिती करमाळा तालुकावासीयांना येत आहे. जातेगाव (ता.करमाळा) येथील व्यवसायीक  दादासाहेब वारे यांच्या कन्येचा विवाह 18 ऑक्टोबरला  पोथरे येथील आनंदी मंगल कार्यालयात  होत आहे. या विवाहातील वधुवरांना चक्क हॅलीकॉप्टरने पुण्याहून-जातेगाव ला आणण्यात येणार आहे.

जातेगाव येथील शहाजी उर्फ नानासाहेब वारे ज्यांना दादासाहेब म्हणून ओळखतात.  त्यांची कन्या माधुरी हीचा विवाह देवळाली (ता.करमाळा) येथील कै.दिलीप सुर्वे यांचे चिरंजीव मनोज याच्या बरोबर 18 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता पोथरे येथील आनंदी मंगल कार्यालयात होणार आहे.

श्री.वारे हे पुणे येथे खराडी भागात रहातात. तेथून ते नवरा-नवरीला हॅलीकॉप्टर ने आणणार आहेत. तेथील बाळूमामाचे मंदिरावर पुष्पवृष्टी करणार, त्यानंतर करमाळा येथील देवीच्यामाळावरील कमलाभवानी मंदिरावर पुष्पवृष्टी करणार व नंतर जातेगाव येथील भैरवनाथ मंदिरावर पुष्पवृष्टी करणार व नंतर वधुवरांना जातेगाव येथे उभारलेल्या  हॅलीपॅड वर उतरून विवाहस्थळी चारचाकी वाहनातून आणले जाणार आहे.

विशेष म्हणजे हे हॅलीकॅटर पोथरे परिसरात उतरवण्यासाठी खर्च करून हॅलीपॅड बनवले होते पण,हॅलिकॉप्टर कंपनीने ती जागा नाकरली. दुसरी जागा नाकरली तर करमाळा येथील जागेला परवानगी नाही. म्हणून श्री.वारे यांनी जातेगाव येथील स्वतःचे घरासमोरच हॅलीपॅड बनवले आहे.

आणखी विशेष म्हणजे हे हॅलीकॅप्टर सायंकाळी 6वाजे पर्यंत करमाळा तालुक्यात थांबणार आहे. त्यामुळे  मधल्या कालावधीत स्थानिक प्रत्येक नागरिकाकडून 4999 रूपये घेऊन तालुक्यातून फेरी मारणार आहे. त्याचा संपर्क 7066797171 या क्रमांकावर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button