breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#HathrasGangRape: ‘पंतप्रधानांणी उत्तर द्यावेच’; दिल्लीतील इंडिया गेट येथे सुरु असलेल्या आंदोलनाच्या वेळी भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची मागणी

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील हाथरस येथील 19 वर्षीय मुलीवर करण्यात आलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावेच अशी मागणी भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केलेली आहे. चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षाकडून दिल्लीतील इंडिया गेट येथे आंदोलन सुरु असताना त्यांनी हे विधान केलेले आहे.

तसेच उत्तर प्रदेशातील भाजप प्रणित सरकारवर ही टीका केली आहे. हाथरस मधील पीडितेचा मंगळवारी मृत्यू झाला. दोन आठवड्यांपूर्वी पीडितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार उत्तर प्रदेशातील पोलिसांकडून करण्यात आले. मात्र आपल्या मुलीच्या अंत्यसंस्कारावेळी परिवारालाच तेथे उपस्थितीत राहण्याची परवानगी सुद्धा देण्यात आलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button