पिंपरी / चिंचवड

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग

पिंपरी l प्रतिनिधी

तरुणीचा सोशल मीडियावर पाठलाग करून तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला. ही घटना सन 2019 ते 28 मार्च 2022 या कालावधीत घडली असून याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 25 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयराज श्रीकांत महिंद्रकर (रा. पिंपळे सौदागर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीचा सोशल मीडियावरून पाठलाग केला. त्यानंतर फिर्यादीकडे लैंगिक संबंधाची मागणी केली. फिर्यादीचे फोटो अश्लील बनवून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच अश्लील मजकूर असलेला मेसेज व मेल करून तरुणीचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button