पिंपरी / चिंचवड
अश्लील मेसेज करून महिलेचा विनयभंग
पिंपरी l प्रतिनिधी
एका तरुणाने महिलेला अश्लील मेसेज करून फोटो पाठवले. ते मेसेज महिलेच्या पतीला दाखवले. याप्रकरणी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार ८ ते ११ मे २०२२ या कालावधीत उर्से येथे घडला.
श्रीकांत रवींद्र ओव्हाळ (वय २५, रा. कामशेत, मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित ४० वर्षीय महिलेने शिरगाव चौकीत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर आरोपीने अश्लील मेसेज पाठवले. तसेच स्वतःचे अश्लील फोटो पाठवून महिलेचा विनयभंग केला. ११ मे रोजी मध्यरात्री महिलेच्या मोबाईलवर रेकॉर्डिंग पाठवून त्रास दिला. ते मेसेज फिर्यादीच्या पतीला दाखवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.