पिंपरी / चिंचवड

चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा छळ

पिंपरी | प्रतिनिधी

लग्नापूर्वीचे मंगळसूत्र घातलेले फोटो पाहून सासरच्या लोकांनी विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्यावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी पतीसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी ते 12 एप्रिल 2022 या कालावधीत चाकण येथे घडला.

पती कमलेश खोले, दीर निलेश खोले, दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या सासरी नांदत असताना आरोपींनी फिर्यादीचे लग्नापूर्वीचे मंगळसूत्र घातलेले फोटो पाहून फिर्यादीचे पूर्वी लग्न झाले असल्याचा गैरसमज करून घेतला. त्यावरून फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ मारहाण करून मारण्याची धमकी दिली. फिर्यादीला उपाशी ठेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तिला क्रूरतेची वागणूक दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button