पिंपरी / चिंचवड

चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ

पिंपरी l प्रतिनिधी

विवाहितेने माहेरहून पैसे न आणल्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केल्याची तक्रार चाकण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार जानेवारी 2019 ते 30 मे 2022 या कालावधीत आंबेठाण चौक चाकण येथे घडला.

विजय अशोक कांडगे (वय 38, रा. आंबेठाण चौक, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने फिर्यादी विवाहीतेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. विवाहितेने माहेरहून पैसे न आणल्याने पतीने विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत शिवीगाळ व मारहाण केली. तसेच फिर्यादी विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button