पिंपरी / चिंचवड

तू राक्षसी वृत्तीची आहेस असे म्हणत विवाहितेचा छळ

पिंपरी l प्रतिनिधी

तू जाडी आहेस. राक्षसी वृत्तीची आहेस. पांढ-या पायाची आहे. तू करण्या कवट्या करतेस. तुझ्यामुळे आमच्या घराचे नाक कापले असे म्हणत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी सासरच्या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 10 जानेवारी 2021 ते मे 2021 या कालावधीत भुसावळ, जि. जळगाव येथे घडली.

पराग दिलीप पाचपांडे (वय 29), सरला दिलीप पाचपांडे, करिष्मा तुषार पाटील, शैला सुधीर पाचपांडे, सुधीर श्रीरंग पाचपांडे, मनकर्णा श्रीरंग पाचपांडे, शोभा बेंडाळे, ललिता कमलाकर पाटील, कमल शिवाजी नारखेडे, जितेंद्र नारखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सासरी नांदत असताना आरोपींनी त्यांच्या घरी येऊन ‘तू जाडी आहेस. राक्षसी वृत्तीची आहे. पांढ-या पायाची आहेस. तू करण्या कवट्या करतेस. तुझ्यामुळे आमच्या घराचे नाक कापले’ असे वेळोवेळी म्हणून फिर्यादीला शारीरिक व मानसिक त्रास दिला.

फिर्यादी यांच्या पतीने फिर्यादिसोबत वैवाहिक संबंध ठेवले नाहीत. तसेच फिर्यादीकडे चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये नाहीतर माझ्याजवळ राहू नको, असे म्हणून फिर्यादी यांचे मानसिक व शारीरिक खच्चीकरण केले. फिर्यादीस वेळोवेळी शिवीगाळ करून हाताने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button