पिंपरी / चिंचवड

विवाहितेचा छळ करत चाकूने वार

पिंपरी l प्रतिनिधी

‘नवरा काही काम धंदा करीत नाही तर तू तुझ्या माहेरहून पैसे घेऊन ये’, असे म्हणत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. तसेच दिराने विवाहितेवर चाकूने वार करून जखमी केले. ही घटना त्रिवेणीनगर, तळवडे येथे मागील दोन वर्षांपासून 25 डिसेंबर 2021 या कालावधीत  घडली.

पती श्रीकांत प्रकाश परब, सासरे प्रकाश भगवान परब (वय 65), सासु (वय 55), दीर श्रीकृष्ण प्रकाश परब (वय 38), एक महिला (वय 37, सर्व रा. त्रिवेणीनगर, तळवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी 28 वर्षीय पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीने त्यांच्यावर संशय घेऊन दारू पिऊन वारंवार शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच अन्य आरोपींनी फिर्यादी यांच्या पतीला न समजावता उलट ‘नवरा काही काम धंदा करीत नाही तर तू तुझ्या माहेरहून पैसे घेऊन ये’, असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. डिसेंबर रोजी आरोपी दीर श्रीकृष्ण याने फिर्यादी महिलेवर चाकूने वार करून त्यांना जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button