TOP Newsपिंपरी / चिंचवडपुणे

देशभक्ती अन् शहीदांचे स्मरण : स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘बाईक रॅली’

  •  प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजपातर्फे शहरातील मोठी शोभायात्रा
  • भाजपाचे एकनाथ पवार, सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांचा पुढाकार

पिंपरी । महान्यूज । विशेष प्रतिनिधी । 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘बाईक रॅली ’ काढण्यात आली. प्रभाग क्रमांक ११ मधील सर्वसामान्य नागरिकांनी या रॅलीमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. या रॅलीद्वारे देशभक्तीपर जनजागृती अन् शहीद जवानांचे स्मरण करण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्रमांक ११ आयोजित पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात मोठी बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी परिसरातील महिला भगिनी युवा वर्ग तसेच नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात या अमृत महोत्सवी शोभा यात्रेमध्ये सहभाग घेतला.
माजी सत्तारुढ पक्षनेते व भाजपाचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, उद्योजक निलेश नेवाळे, मेजर रघुनाथ सावंत, माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव, महादेव कवितके, हरजित बारडा, पोपट हजारे, गोरख पाटील, संतोष ठाकूर, अरुण पाडूळे,अजय पाताडे, कविता हिंगे, तसेच निगडी चिखली मंडल, तसेच बजरंग दल चिखली प्रखंडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले. पूर्णानगर, शिवतेजनगर, कृष्णानगर, सेक्टर २०, कोयना नगर, शरदनगर, नेवाळे वस्ती, घरकुल या मार्गाने रॅली काढण्यात आली.

 

Har Ghar Tiranga: Tricolor Yatra by BJP in Bhosari

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button