दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याला बेड्या : घातक शस्त्र जप्त
पिंपरी l प्रतिनिधी
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या शस्त्र विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 1) चिखली येथे करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
रितेश शंकर टेकाम (वय 19, रा. पाटीलनगर, चिखली), आकाश रवी जेस्वाल (वय 19, रा. चिखली), ऋषिकेश राजेंद्र भोसले (वय 21, रा. चिखली), शुभम वैजनाथ जाधव (वय 19, रा. चिखली), टिळकराम बाबूलाल गौड (वय 19, रा. चिखली), वैष्णव दीपक चेके (वय 19, रा. चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या एका 15 वर्षीय साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
विशाल दलपत्रे, रिंकू कुमार, अशोक भोसले (सर्व रा. चिखली) हे तिघेजण शस्त्रासह पळून गेले आहेत.
चिखली गावातील एका घरात आठ ते दहाजण थांबले असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती शस्त्र विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चिखली येथे सापळा लाऊन कारवाई केली. सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन तलवार, एक कोयता, सुरा, हॉकीस्टिक, कटावणी, मिरची पावडर असा ऐवज पोलिसांना आढळला. याबाबत आधीच चौकशी केली असता आरोपी रितेश टेकाम याने सांगितले कि ते कुठेतरी दरोडा टाकणार होते. त्याची तयारी करून ठेवली होती. पोलिसांनी सहा जनना अटक केली. एका अल्पवयीन मुंलाला ताब्यात घेतले. पोलिसांना पाहून तिघेजण पळून गेले. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.