breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘हमाम में सब नंगे होते है’, हप्ते वसुलीवरून फडणवीस-राऊत आमनेसामने

नवी दिल्ली – सचिन वाझे प्रकरणावरून ठाकरे सरकारला धारेवर धरत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाझेंची खरे बॉस शोधण्याची मागणी केली होती. थेट दिल्लीत पत्रकार परिषद घेत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. यावेळ बोलताना फडणवीसांनी ‘सचिन वाझे हे काहींसाठी वसुली एजंटचं काम करत होते’, असा आरोप केला होता. या टीकेला आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.

कुणाच्या राज्यात कोण वसुली करत होतं आणि त्यांचे वसुली इनचार्ज कोण होते, यासंदर्भात किमान राजकारणातल्या लोकांनी तरी बोलू नये. हमाम में सब नंगे होते है, अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांना उत्तर दिले.

वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23,70,507 वर

याआधी बोलताना फडणवीस म्हणाले होते की, सचिन वाझे हे काहींसाठी वसुली एजंटचं काम करत होते, त्यांचे खरे ऑपरेटर्स कोण आहेत, हे शोधून काढलं पाहिजे. मुंबईतील बेटिंग रॅकेटचे धागेदोरे देखील वाझेंशी संबंधित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बदलीवर देखील संजय राऊत यांनी भाष्य केले. राऊत म्हणाले की, रमबीर सिंग यांची बदली हा मुद्दाच नाहीये. ज्या प्रकारचं वातावरण बनलं होतं, त्यावर मुख्यमंत्र्यांना वाटलं की ज्या अधिकाऱ्याबाबत शंका आहे, त्याचा तपास होईपर्यंत बदली व्हायला हवी. विरोधकांना वाटतंय हा खूप मोठा मुद्दा आहे. पण हा मुद्दाच नाहीये. जर विरोधकांना याचा मुद्दा बनवायचा असेल, तर तो त्यांनी पुढची साडेतीन वर्ष तो बनवत राहावा. सरकारचा केसही कुणी वाकडा करू शकत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button