TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

नागपूरमध्ये भटक्या श्वानांचा हैदोस

नागपुरात गेल्या साडेसहा वर्षांत शहरातील ५८ हजार २४ नागरिकांना श्वानांनी चावा घेतला. माहितीच्या अधिकारातून ही बाब सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणली.

महापालिकेच्या सर्वेक्षण शहरातील दहा झोनमध्ये ८१ हजार १८८ श्वान असून त्यातील ७१ हजार १८५ भटके आहेत. या श्वानांपैकी १६ टक्के श्वानांची नसबंदी झाली. हे सर्वेक्षण २०१७ दरम्यानचे आहे. तर महापालिका हद्दीत २०१६- १७ या आर्थिक वर्षांत ९ हजार ९३० जणांना श्वानांनी चावा घेतला. २०१७- १८ मध्ये ९ हजार ८६०, २०१८- १९ मध्ये ११ हजार ६३३, २०१९- २० मध्ये १२ हजार ४८८, २०२०- २१ मध्ये २ हजार ५८४, २०२१- २२ मध्ये ६ हजार ८०६ तर एप्रिल २०२२ ते ऑक्टोंबर २०२२ दरम्यान ४ हजार ७२३ जणांचा श्वानांनी चावा घेतला. या सर्व रुग्णांना महापालिकेने १ लाख ५१ हजार ३५८ ॲन्टी रॅबीज लस दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button