पिंपरी / चिंचवड

एच.यु.एफ. इंडीया कंपनीत कोटयावधी रुपयाचा अपहार करणा-या कंपनीतील उच्च अधिका-यांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

सन 2010 ते मे 2020 या कालावधी एचयुएफ इंडीया प्रा.लि. नानेकरवाडी, चाकण येथील उच्च पदावर काम करीत असलेले पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात पैशाचा अपहार केल्याची तक्रार संदिप जगदिश चौधरी यांनी दिली होती. त्या प्रकरणातील तिघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

विशाल विनयकुमार टमोटिया (वय 45, रा. मोशी, पुणे), निखील नरेंद्रकुमार आगरवाल (वय 45, रा. कस्पटेवस्ती, वाकड), संदिप राधाकृष्ण वाणी (वय 56, रा. लिंक रोड, चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

व्यवस्थापकीय संचालक सुनिल कुमार गर्ग, फायनान्स हेड निखील अगरवाल, ऑपरेशन संदिप वाणी व आटी हेड विशाल टमोटीया यांनी सर्वांनी मिळुन आपआपले पदाचा गैरवापर करुन स्वताचे आर्थिक फायदयासाठी आपआपसात संगणमत करुन, कंपनीचे इतर डायरेक्टर व जर्मनी येथील मुख्य कंपनी एच.यु.एफ हल्सबेक अॅण्ड फुर्स्ट जीएमबीएच अॅण्ड कंपनी केजी, बेल्बर्ट यांना कंपनीचे परचेस हेड श्रीपाद कुलकर्णी व त्यांचे टिमला कोणतीही माहीती न देता 170 व 172 या खोटया परचेस ऑर्डस सिरीज तयार करून त्याव्दारे वेगवेगळ्या व्हेन्डरकडून खोटे इनव्हाईस घेवून त्या इनव्हाईसवर एच. यु.एफ. इंडीया प्रा.लि.चा खोटा स्टॅम्पचा वापर केला. खोटे गुडस रिसीट नोटस (जीआरएन) बनवुन, इनव्हाईसमधील माल कंपनीमध्ये न आणता मेनगेट रजिस्टरमध्ये खोटया नोंदी केल्या. सदरच्या इनव्हाईस मधील मालाचे बिलाची रक्कम व्हेन्डरला कंपनीच्या बँक खात्यामधुन दिली. तसेच वेगवगेळ्या एनजीओला आवश्यक नसताना देखिल डोनेशन व सीएसआरव्दारे मोठया प्रमाणात रक्कम देवुन व अशाच वेगवेगळ्या प्रकारचे इतर गैरव्यवहार करून, एचयुएफ इंडीया प्रा.लि.क ची एकुन सुमारे 139 कोटी रुपयांची आर्थिक फसवणुक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले होते.

दाखल गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक व्हि.एस. धुमाळ या करीत असताना त्यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखे कडील पोलीस उप निरीक्षक समीर दाभाडे व पो. हा अमित गायकवाड यांनी आरोपीचे मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषन केले असता आरोपीची माहिती मिळताच आर्थिक गुन्हे शाखेकडील टिम तयार करून आरोपींचे लोकशन काढले. त्यानुसार पोलिसांनी विशाल, निखील आणि संदीप या तिघांना अटक केली. आरोपींकडून 17 लाख 74 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी हे उच्चशिक्षीत असुन स्वतःच्या पदाचा गैरवापर करून कंपनीत गैरव्यवहार करत असल्याचे उघड झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button